AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs BAN: पाकिस्तान-बांगलादेश पहिला कसोटी सामना बुधवारपासून, जाणून घ्या सर्वकाही

Pakistan vs Bangladesh 1st Test All Details: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. जाणून घ्या सर्वकाही.

PAK vs BAN: पाकिस्तान-बांगलादेश पहिला कसोटी सामना बुधवारपासून, जाणून घ्या सर्वकाही
shan masood and najmul hussain shantoImage Credit source: Pakistan Cricket
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 20, 2024 | 11:41 PM
Share

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवार 21 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा रावळपिंडी येथे खेळवण्यात येणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 10 वाजता टॉस होणार आहे. शान मूसद पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर नजमूल हुसैन शांतो याच्याकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्यानिमित्ताने उभयसंघातील कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी जाणून घेऊयात. तसेच पहिला सामना कुठे पाहता येणार? याची माहिती घेऊयात.

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही.  बांगलादेशला अद्याप कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे आता बांगलादेशचा पाकिस्तानला पराभूत करत कसोटी क्रिकेटमधील पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.

बांगलादेश पाकिस्तान विरुद्ध फुस्स

बांगलादेशची कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध निराशाजनक कामगिरी राहिली आहे. बांगलादेशला पाकिस्तान विरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही. उभयसंघातील ही सातवी टेस्ट सीरिज आहे. त्याआधीच्या एकूण 6 मालिकांमध्ये पाकिस्ताननेच विजय मिळवला आहे. दोन्ही संघात एकूण 6 मालिकांमध्ये 13 सामने झाले आहेत. बांगलादेशला या 13 मधून फक्त 1 सामना अनिर्णित सोडवता आला आहे. तर उर्वरित 12 सामन्ंयामध्ये पाकिस्तानने विजय मिळवलाय.

पाकिस्तान-बांगलादेश कसोटी मालिकेसाठी सज्ज

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), सौद शकील (उपकर्णधार) अब्दुल्लाह शफीक, सॅम अय्युब, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान अली आघा, शाहीन शाह अफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहझाद आणि मोहम्मद अली.

कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटॉन कुमार दास, मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, शरीफुल इस्लाम, हसन महमूद, तस्कीन अहमद आणि सय्यद खालेद अहमद.

Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर