PAK vs ENG 1st Test : पाकिस्तान-इंग्लंड भिडणार, पहिला सामना केव्हा?

Pakistan vs England 1st Test Live Streaming : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा मुल्तान येथे खेळवण्यात आला आहे. दोन्ही संघांनी सामन्याआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे.

PAK vs ENG 1st Test : पाकिस्तान-इंग्लंड भिडणार, पहिला सामना केव्हा?
Ollie Pope and shan masood pak vs eng test series
Image Credit source: Pakistan Cricket X Account
| Updated on: Oct 06, 2024 | 6:22 PM

बांगलादेशने गेल्या कसोटी मालिकेत 2-0 ने लोळवल्यानंतर आता पाकिस्तान मायदेशात पु्न्हा एकदा रेड बॉल क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. पाकिस्तान मायदेशात इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बेन स्टोक्स याच्या अनुपस्थितीत ओली पोप हा पहिल्या सामन्यात इंग्लंडचं नेतृ्त्व करणार आहे. शान मसूद याच्याकडे पाकिस्तानची कॅप्टन्सी आहे. दोन्ही संघांसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप लीगच्या हिशोबाने ही मालिका महत्त्वाची आहे. हा पहिला सामना केव्हा आणि कुठे खेळवण्यात येणार? याबाबत जाणून घेऊयात.

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड पहिला सामना कसोटी सामना केव्हा?

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड पहिला सामना कसोटी सामना सोमवारी 7 ऑक्टोबरपासून खेळवण्यात येणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड पहिला सामना कसोटी सामना कुठे?

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड पहिला सामना कसोटी सामना मुल्तान क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड पहिला सामना कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड पहिल्या सामना कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 10 वाजता टॉस होईल.

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड पहिला सामना कसोटी सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड पहिला सामना कसोटी सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही. तर सामना मोबाईलवर फॅनकोड एपवर पाहायला मिळेल.

पाकिस्तान-इंग्लंड कसोटी मालिकेसाठी सज्ज

पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (विकेटकीपर) , सईम अयूब, अब्‍दुल्लाह शफीक, बाबर आजम, सऊद शकील, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सलमान अली आगा, आमिर जमाल, शाहीन शाह अफरीदी, नसीम शाह आणि अबरार अहमद.

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.