Pakistan vs India | Virat Kohli याचा वर्ल्ड रेकॉर्ड, पाकिस्तानला फोडून काढला
Virat Kohli World Record Asia Cup 2023 Super 4 | विराट कोहली याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कोलंबोत झंझावाती शतकी खेळी केली. विराटने या शतकासह अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले.

कोलंबो | विराट कोहली याने पाकिस्तान विरुद्ध आशिया कप 2023 सुपर 4 सामन्यात मोठा कारनामा केला आहे. विराटने पाकिस्तान विरुद्ध केएल राहुल याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 233 रन्सची नॉटआऊट रेकॉर्ड पार्टनरशीप केली. विराट कोहली याने या दरम्यान खणखणीत शतक पूर्ण केलं. विराटने 94 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 कडक सिक्सच्या मदतीने 122 धावांची नाबाद शतकी खेळी केली. विराट कोहलीने यासह वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. विराट कोहली अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
विराट कोहली याचा वर्ल्ड रेकॉर्ड
विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये वेगवान 13 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. विराटने याबाबतीत टीम इंडियाचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. विराटला या सामन्याआधी 13 हजार धावा पूर्ण करण्यााठी 90 धावांची गरज होती. विराटने 90 धावा पूर्ण करत हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
विराट 13 हजारी
Fastest to 13000 ODI runs.
Take a bow, @imVkohli 🙌🙌#TeamIndia pic.twitter.com/UOT6HsJRB2
— BCCI (@BCCI) September 11, 2023
विराटने अवघ्या 267 वनडे डावांमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकर याला 13 हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी 321 डाव खेळावे लागले होते. तर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंग याने 341 इनिंग्समध्ये 13 हजार एकदिवसीय धावा पूर्ण केल्या होत्या. इतकंच नाही, तर विराट वनडेत सर्वाधिक शतकं ठोकणारा एकूण दुसरा आणि पहिला सक्रिय फलंदाजही आहे.
सचिन तेंडुलकर याच्या नावावर सर्वाधिक 49 एकदिवसीय शतकांचा विक्रम आहे. तर त्यानंतर विराट कोहली सर्वाधिक शतकांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. विराटचं पाकिस्तान विरुद्धचं वनडे करियरमधील 47 वं शतक ठरलं. त्यामुळे आता विराटचं पुढील लक्ष हे सचिनचा वनडे शतकांचा रेकॉर्ड ब्रेक करण्यावर असणार आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.
