Video : दक्षिण अफ्रिकेपुढे पाकिस्तानचे गोलंदाज हतबल, शाहीन आफ्रिदी मर्यादा ओलांडत उतरला हाणामारीवर
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानची लिटमस टेस्ट होत आहे. ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने फलंदाजी करताना पाकिस्तानच्या गोलंदाजांना हतबल केलं. या सामन्यात हतबल झालेल्या शाहीन आफ्रिदीने तर भर मैदानात मॅथ्यू ब्रीत्झकेशी वाद घातला.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात ट्राय सिरीज सुरु आहे. या मालिकेत न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली आहे. तर दुसऱ्या संघासाठी पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना सुरु आहे. पण या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा संघ चांगल्या स्थितीत आहे. दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कर्णधार टेम्बा बावुमा आणि ब्रीत्झकेने दुसऱ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी तोडताना पाकिस्तानचे गोलंदाज पुरते हैराण दिसले. कर्णधार मोहम्मद रिझवानने संघाचं 28वं षटक शाहीन आफ्रिदीकडे सोपवलं होतं. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मॅथ्यू ब्रीत्झकेने मिड ऑनवरून फटका मारला. यानंतर आफ्रिदीने मॅथ्यूला डिवचलं. मॅथ्यू एक दोनदा खेळपट्टीच्या मधून धावल्याने शाहीन आफ्रिदी नाराज झाला होता. यामुळे शाहीन आफ्रिदीने त्याला काहीतरी बोलला आणि डोळे दाखवले. याचं मॅथ्यूनेही उत्तर दिलं.
शाहीन आफ्रिदीच्या पुढच्या चेंडूवर मॅथ्यूने एक धावा आणि जेव्हा तो धावला तेव्हा आफ्रिदी मधे आला. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलं. हे प्रकरण वाढत असल्याचं पाहत पंचांना मध्यस्थी केली आणि प्रकरण शांत केली. यासाठी दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा आणि मोहम्मद रिझवानने चर्चा केली आणि प्रकरण शांत केलं. पण या प्रकरणी शाहीन आफ्रिदी थेट ब्रीत्झकेशी वाद घालण्यापेक्षा पंचांना सांगू शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. पहिल्यांदा वाद घातला आणि नंतर धाव घेत असताना त्रास देण्याचा प्रयत्न केला.
It’s getting all heated out there! 🥵
Shaheen Afridi did not take kindly to Matthew Breetzke’s reaction, leading to an altercation in the middle! 🔥#TriNationSeriesOnFanCode pic.twitter.com/J2SutoEZQs
— FanCode (@FanCode) February 12, 2025
टेम्बा बावुमा आणि मॅथ्यू ब्रीत्झकेची जोडी फोडण्यात 29 व्या षटकात यश आलं. धाव घेताना सउद शकीलने त्याला धावचीत केलं. तो बाद झाल्यानंतर कामरान गुलामने आक्रमक जल्लोष केला. त्याच्या समोर आक्रमक आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, असं असलं तरी दक्षिण अफ्रिकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी 353 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हे आव्हान कठीण असून पराभव झाला तर पाकिस्तानचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगणार आहे.
