
पाकिस्तान क्रिकेट टीम कायम ट्रोल होत असते. पाकिस्तानचे खेळाडू ज्या पद्धतीने फिल्डिंग करतात त्यावरुन पाकिस्तान टीमची कायमच खिल्ली उडवली जाते. पाकिस्तानला गेल्या काही काळात अनेक द्विपक्षीय मालिकांसह अनेक स्पर्धेत काही खास करता आलेलं नाही. त्यामुळे पाकिस्तानला अनेकदा टीकेचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानचा आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध सामना होणार आहे. पाकिस्तान आशिया कपआधी टी 20i ट्राय सीरिज खेळणार आहे. या मालिकेत सलमान अली आगा पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. या मालिकेला 29 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी सलमान अली आगा आणि पाकिस्तानचा भर पत्रकार परिषदेत अपमान झाला. नक्की काय झालं? सविस्तर जाणून घेऊयात.
अफगाणिस्तान, यजमान यूएई आणि पाकिस्तान यांच्यात टी 20i ट्राय सीरिज होणार आहे. या ट्राय सीरिजच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पत्रकार परिषेदला तिन्ही संघांचे कर्णधार उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नामुळे पाकिस्तानचा अपमान झाल्याचं म्हटलं जात आहे.
पत्रकार परिषदेत तिन्ही संघांच्या कर्णधारांना ट्राय सीरिज आणि आशिया कप 2025 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न विचारण्यात आले. या दरम्यान एका पत्रकाराने अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याला एक प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताच सलमानचा चेहरा पडला.
पाकिस्तान टीम इंडियानंतर आशियातील दुसरी सरस टीम होती. मात्र पाकिस्तानला गेल्या काही वर्षांत तशी कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तानला गेल्या काही वर्षांत त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तर दुसऱ्या बाजूला काही वर्षात अफगाणिस्तान क्रिकेट संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अफगाणिस्तान आशियातील टी 20i क्रिकेटमधील दुसरा यशस्वी संघ म्हणून नावारुपास आला आहे. या मुद्द्याला धरुन पत्रकाराने राशिदला प्रश्न केला.
“अफगाणिस्तान आशियातील टी 20i क्रिकेटमधील दुसरी सर्वोत्तम टीम झाली आहे. त्यामुळे ट्राय सीरिजसाठी तुमचं लक्ष्य काय?”, पत्रकाराने राशिदला प्रश्न विचारला. त्यामुळे राशिदच्या शेजारी असलेल्या सलमानचा चेहराच पडला. सलमानच्या चेहऱ्यावरील भाव बोलके होते. मात्र सलमानला इच्छा असूनही काही बोलता आलं नाही. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
..आणि पाकिस्तानच्या कॅप्टनचा चेहरा पडला
Salman Ali Agha made a face and smirked when a reporter called the Afghanistan team the second-best team in Asia pic.twitter.com/vZzfYTUS2b
— Thakur (@hassam_sajjad) August 28, 2025
पाकिस्तानच्या कामगिरीचा आलेख गेल्या काही महिन्यांपासून पडला आहे. पाकिस्तानला गेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीतून बाहेर व्हावं लागलं होतं. पाकिस्तानला तुलनेत नवख्या अमेरिकेकडून पराभूत व्हावं लागलं होतं. तसेच काही महिन्यांपूर्वी आयर्लंडने टी 20i मालिकेतील सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला होता.