पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर काय दिवस आले, अक्षरक्ष: अब्रु निघाली
पाकिस्तान क्रिकेट मध्ये सध्या सर्वकाही सुरळीत नाहीय. आधी स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) दुखापतीमुळे आशिया कप (Asia cup) मधून बाहेर गेला.

मुंबई: पाकिस्तान क्रिकेट मध्ये सध्या सर्वकाही सुरळीत नाहीय. आधी स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) दुखापतीमुळे आशिया कप (Asia cup) मधून बाहेर गेला. त्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केलं. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) लीग सुरु करायची आहे. पण या लीग मधील संघ विकत घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीय. पीसीबीला पाकिस्तान ज्यूनियर लीगच आयोजन करायचं आहे. या लीग मध्ये सहा संघ आहेत. या टीम्स विकत घेण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही, त्यावेळी पीसीबीला मोठा झटका बसला.
पाकिस्तान लीग मध्ये कोणालाही रस नाही
पाकिस्तान लीग मधील या टीम्ससाठी जावेद मियांदाद, विवियन रिचर्ड्स, शाहीद आफ्रिदीसारखे दिग्गज खेळाडू मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक होते. पण या लीगच्या संघांमध्ये कोणीही इंटरेस्ट दाखवला नाही. कोणीच खरेदीदार मिळत नाही हे लक्षात आल्यावर पीसीबीला पाकिस्तान ज्यूनियर लीग निर्धारित कार्यक्रमानुसार होईल, हे जाहीर करावं लागलं. स्वत: पीसीबी या स्पर्धेचं मॅनेजमेंट संभाळणार आहे.
का कोणी बोली लावली नाही?
जावेद मियांदाद, विवियन रिचर्ड्स, इम्रान ताहीर, डेरेन सॅमी, कॉलिन मुनरो, शाहीद आफ्रिदी आणि शोएब मलिक हे ज्यूनियर लीग मधल्या संघांचे मार्गदर्शनक असणार आहेत. पाकिस्तान बोर्डाने या सहा टीम्सवर बोली लावण्याचं आवाहन केलं होतं. पीसीबीने ठरवलेल्या मुल्यावर कोणीही बोली लावण्यासाठी पुढे आलं नाही.
