AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधीच पाकिस्तानचा ‘गेम ओव्हर’! जय शाह अध्यक्ष होताच धाबे दणाणले

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. पण या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानाच जाणार की नाही याबाबत शंका आहे. असं असताना आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची नियुक्ती झाल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधीच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! जय शाह अध्यक्ष होताच धाबे दणाणले
| Updated on: Aug 27, 2024 | 9:34 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा पाकिस्तानात होणार असल्याने बरीच चर्चा रंगली आहे. भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवण्याची चर्चा सुरु झाली होती. आशिया कप स्पर्धा अशीच हायब्रीड मॉडेलवर खेळवली गेली होती. मात्र यावेळेस पीसीबी काहीही झालं तर स्पर्धा पाकिस्तानाच होईल असं सांगत आहे. मात्र या आडमुठ्या भूमिकेला धक्का बसणार आहे. कारण बीसीसीआय सचिव जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आयसीसीची सूत्र आता जय शाह यांच्या हाती गेली आहेत. त्यामुळे पाकिस्तानची मोठी अडचण झाली आहे. 1 डिसेंबर 2024 पासून जय शाह अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.  त्यामुळे आयसीसी अध्यक्षांच्या भूमिकेकडे लक्ष लागून असेल. जय शाह अध्यक्ष असल्याने पाकिस्तानची अडचण होणार हे निश्चित आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून एकूण 15 सामने होणार आहेत. 12 सामने साखळी फेरीचे होणार आहे. तर दोन सामने उपांत्य फेरीचे आणि एक सामना अंतिम फेरीचा असेल. भारत आणि पाकिस्तान हे संघ एकाच गटात आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटात भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. तर ब गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीने आधीच 586 कोटी रुपये मंजूर केलं आहे. पण भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला तर 45 लाख डॉलर्स अतिरिक्त दिले आहेत. म्हणजेच 37.67 कोटी रुपयांचं अतिरिक्त बजेट ठेवलं आहे.  त्यामुळे हायब्रीड मॉडेलची तयारी आधीपासूनच सुरु झाल्याचं दिसत आहे. हायब्रिड मॉडेलवर स्पर्धा झाल्यास सामने दुबईत होईल, असं सांगण्यात येत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वेळापत्रक

  • 19 फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (कराची)
  • 20 फेब्रुवारी, भारत विरुद्ध बांग्लादेश (लाहोर)
  • 21 फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका (कराची)
  • 22 फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (लाहोर)
  • 23 फेब्रुवारी, न्यूझीलंड विरुद्ध भारत (लाहोर)
  • 24 फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश (रावळपिंडी)
  • 25 फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड (लाहोर)
  • 26 फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रिका (रावळपिंडी)
  • 27 फेब्रुवारी, बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड (लाहोर)
  • 28 फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (रावळपिंडी)
  • 1 मार्च, भारत विरुद्ध पाकिस्तान (लाहोर)
  • 2 मार्च, दक्षिण अफ्रिका विरुद्ध इंग्लंड (रावळपिंडी)
  • 5 मार्च, उपांत्य फेरी 1 (कराची)
  • 6 मार्च, उपांत्य फेरी 2 (रावळपिंडी)
  • 9 मार्च, अंतिम फेरी (लाहोर)
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.