आता पुन्हा संधी नाही! भारताविरूद्धचा पराभव पाकिस्तानच्या दोन स्टार खेळाडूंना पडणार महागात

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने एकतर्फी विजय मिळवला. भारताने या सामन्यात पाकिस्तानला 61 धावांनी लोळवलं. यामुळे पाकिस्तानचं सुपर 8 फेरीचं स्थान डळमळीत झालं आहे. आता शेवटच्या सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल. असं असताना दोन स्टार खेळाडूंना संघातून बाहेर करण्याची शक्यता वाढली आहे.

आता पुन्हा संधी नाही! भारताविरूद्धचा पराभव पाकिस्तानच्या दोन स्टार खेळाडूंना पडणार महागात
आता पुन्हा संधी नाही! भारताविरूद्धचा पराभव पाकिस्तानच्या दोन स्टार खेळाडूंना पडणार महागात
Image Credit source: Icc X account
| Updated on: Feb 16, 2026 | 5:21 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला. खरं तर या सामन्यात पाकिस्तानचा संघ कुठेच नव्हता. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला इतकंच काय ते यश.. बाकी सर्वकाही भारताच्या पारड्यात पडलं. या पराभवामुळे पाकिस्तानला आता सुपर 8 फेरीत स्थान मिळवण्यासाठी शेवटचा सामना जिंकणं भाग आहे. जर या सामन्यात पराभव झाला तर पाकिस्तानला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागेल. असं असताना भारताविरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये उलथापालथीची जोरदार चर्चा रंगली आहे. काही खेळाडूंना कायमस्वरूपी बाहेर काढण्याची मागणी जोर धरत आहे. यात स्टार फलंदाज बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांचं नाव आघाडीवर आहे. कारण या दोघांची कामगिरी सुमार राहिली. त्याच्या सुमार कामगिरीमुळे पाकिस्तानचा पराभव झाला असं म्हणणं आहे.

भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 175 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण पाकिस्तानचा संघ सर्व गडी गमवून 114 धावा करून शकला. त्यामुळे 61 धावांनी पराभव झाला आणि नेट रनरेटवरही त्याचा परिणाम झाला. या सामन्यात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, शादाब खान, मोहम्मद नवाज यासारख्या अनुभवी खेळाडूंनी निराश केलं. त्याच्या सुमार कामगिरीचा फटका पाकिस्तानला आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. यात कारणामुळे संघातून दिग्गज खेळाडूंना बाहेर काढण्याची मागणी जोर धरत आहे. पाकिस्तान नामिबिया सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी बसवण्याची मागणी होत आहे. कारण हा सामना जिंकला तरच पाकिस्तान पुढच्या फेरीत जाईल. अशा स्थितीत या दोघांना घेऊ नका अशी चर्चा आता रंगली आहे.

पाकिस्तान नामिबिया सामन्यावर सुपर 8 फेरीचं गणित अवलंबून आहे. पाकिस्तानने हा सामना जिंकला तर सुपर 8 फेरीत जागा मिळवेल. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची मागणी होत आहे. आता कर्णधार सलमान आगा काय निर्णय घेतो याकडे लक्ष असणार आहे. प्रेमदासा स्टेडियममध्ये शाहीन आफ्रिदी चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा होती. पण त्याने 2 षटकात 31 धावा दिल्या. याच खेळपट्टीवर हार्दिक आणि बुमराहने 4 विकेट घेतल्या. तर पाकिस्तानी संघ अडचणीत असताना बाबर आझमकडून संयमी खेळीची अपेक्षा होती. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. त्याला फक्त 5 धावा करता आल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us