
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि भारत या संघांची वर्णी लागली आहे. तर पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात या स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना होता. पण हा सामनाही पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे या स्पर्धेचा शेवट विजयाने करण्याची संधी दोन्ही संघाकडून हुकली असंच म्हणावं लागेल. पाकिस्तानची या स्पर्धेत सुमार कामगिरी राहिली. पाकिस्तानने या स्पर्धेत एकही सामना जिंकला नाही. या स्पर्धेत मिळालेले तीन गुण देखील पावसामुळे सामना रद्द झाले म्हणून मिळाले. म्हणजेच सात पैकी 4 सामन्यात पराभव आणि तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची या स्पर्धेत दैना झाली असंच म्हणावं लागेल. या स्पर्धेनंतर फातिमा सनावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे. पण त्या आधीच फातिमा सनाने टी20 वर्ल्डकपबाबत रणनिती काय असेल ते सांगून टाकलं आहे.
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये होत आहे. या स्पर्धेसाठी आतापासूनच तयारी सुरु झाली आहे असं म्हणाव लागेल. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना म्हणाली की, ‘अलिकडच्या काळात आम्ही जास्त क्रिकेट खेळत नाही आहोत. आम्ही फक्त एका मालिकेनंतर पात्र ठरलो. म्हणून, मला वाटते की विश्वचषकानंतर आम्हाला निश्चितच खूप क्रिकेटची आवश्यकता आहे. निश्चितच पुढच्या वर्षी टी20 विश्वचषक देखील आहे. म्हणून, आशा आहे की आम्हाला खूप क्रिकेट मिळेल आणि मोठ्या स्पर्धांसाठी स्वतःला तयार करू.’
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाद झाल्यानंतर कर्णधार फातिमा सनाने न्यूझीलंडलच्या केन विल्यमसनचं उदाहरण दिलं. फातिमा सना म्हणाली की, ‘मी नेहमीच केन विल्यमसनकडे पाहत आहे. तो जवळजवळ अगदी जवळचा विश्वचषक गमावला होता, पण तरीही तो हसत आहे. म्हणून, मी फक्त शांत राहण्याचा प्रयत्न करतो. अर्थात, जेव्हा तुम्ही कर्णधार असता तेव्हा तुम्ही निर्णय घेता, विशेषतः हरलेल्या संघाचे. पण एक कर्णधार म्हणून आणि सर्वात तरुण कर्णधार म्हणून, तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आशा आहे की, पुढील विश्वचषक आणि पुढील सामन्यांमध्ये, आम्ही एक खूप मजबूत संघ आहोत आणि एक चांगला संघ बनण्याचा प्रयत्न करतो.’