न्यूझीलंडच्या दुय्यम संघाने पराभूत करताच पाकिस्तानने गाळले मगरीचे अश्रू, अझहर महमूद म्हणाला..

| Updated on: Apr 22, 2024 | 5:43 PM

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा सामना 25 एप्रिलला लाहोरमध्ये खेळला जाणार आहे. तर 27 एप्रिलला मालिकेचा शेवट होणार आहे. या दोन्ही सामन्यांवर मालिकेचा निकाल अवलंबून आहे. असं असताना पाकिस्तानचे प्रशिक्षक अझहर महमूदने आर्मी ट्रेनिंग कॅम्पवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

न्यूझीलंडच्या दुय्यम संघाने पराभूत करताच पाकिस्तानने गाळले मगरीचे अश्रू, अझहर महमूद म्हणाला..
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघात बरीच उलथापालथ झाली आहे. टी20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद पुन्हा एकदा बाबर आझमकडे सोपवण्यात आलं आहे. तसेच खेळाडूंनी टी20 वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करावी यासाठी आर्मीकडून विशेष ट्रेनिंग देण्यात आलं. मात्र इतकं सगळं करूनही पाकिस्तानी संघात तसा काही बदल दिसलेला नाही. पाकिस्तान न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. न्यूझीलंडने पाकिस्तान दुय्यम संघ पाठवला आहे. कारण दिग्गज खेळाडू आयपीएल खेळत आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा संघ सहज मालिका जिंकेल असं वाटत होतं. मात्र पाकिस्तान न्यूझीलंड मालिकेत वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. 18 एप्रिल रोजी पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर दुसरा सामना पाकिस्तानने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. तर तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला 7 गडी राखून मात दिली. यामुळे मालिकेत 1-1 ने बरोबरी असून पुढील दोन्ही सामने महत्त्वाचे आहेत. पण पराभवाची जबाबदारी घेण्याऐवजी संघाचे हेड कोच अझहर महमूदने आरोप लावले आहेत. तसेच टीमच्या आर्मी ट्रेनिंग प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

पाकिस्तान संघाने या मालिकेपूर्वी अबोटाबादच्या काकुल आर्मी कॅम्पमध्ये दोन आठवडे ट्रेनिंग घेतलं होतं. आता यावर हेड कोचने बोट ठेवलं आहे. हेवी ट्रेनिंगमुळे खेळाडू थकल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच परफॉर्म करत नसल्याचा आरोप केला आहे. अझहर महमूदच्या मते, “खेळाडू थकले तर आहेतच वरून जखमीही होत आहे. टी20 वर्ल्डकपपूर्वी ही काही चांगली बाब नाही.” न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत तीन खेळाडू जखमी झाले आहेत. यात आझम खान, मोहम्मद रिझवान आणि इरफान खानचा समावेश आहे.

अझहर महमूदने सांगितलं की, “मोहम्मद रिझवान आणि इरफान खानला जवळपास सारखीच जखम आहे. रिझवानला तिसऱ्या टी20 सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर रिटायर्ड हर्ट होत डगआऊटमध्ये आला. आम्ही कोणतीही घाई करू इच्छित नाही. ज्यामुळे दुखापत आणखी वाढेल. दुखापतीमुळे रिझवान पुढच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच आहे.” दुसरीकडे, आझम खान दुखापतीमुळे टी20 सीरिजला मुकला आहे. आता त्याचं टी20 वर्ल्डकपमध्ये खेळणंही कठीण आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), सैम अयुब, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), उस्मान खान, इरफान खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर, अबरार अहमद, फखर जमान, इमाद वसीम, उसामा मीर , अब्बास आफ्रिदी, जमान खान.

न्यूझीलंड संघ: टिम सेफर्ट (विकेटकीपर), टीम रॉबिन्सन, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, कोल मॅककॉन्ची, मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), ईश सोधी, जेकब डफी, बेन सियर्स, बेन लिस्टर, जोश क्लार्कसन, टॉम ब्लंडेल, विल्यम ओरुरके, झकरी फॉल्केस