Pakistan vs Canada: व्हिडीओला लाईक करणं या खेळाडूला पडलं महागात, बाबर आझमने नाणेफेकीनंतर काढला काटा

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानची करो या मरोची स्थिती आहे. दोन्ही सामन्यात हीच परिस्थिती पाकिस्तानी संघाची आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचा संघ कॅनडाशी लढत आहे. मागच्या दोन सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. मात्र या सामन्यात बाबर आझमने आपला राग एका खेळाडूवर बरोबर काढला आहे.

Pakistan vs Canada: व्हिडीओला लाईक करणं या खेळाडूला पडलं महागात, बाबर आझमने नाणेफेकीनंतर काढला काटा
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 8:54 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आर्मी ट्रेनिंग घेऊनही फारसा काही फायदा झालेला नाही. अमेरिकेनंतर भारतानेही पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामुळे आता सुपर 8 फेरीचं दोन सामन्यातील विजयासह इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून आहे. पाकिस्तानचा सामना कॅनडाशी होत असून नाणेफेकीचा कौल बाबर आझमच्या बाजूने लागला. क्षणाचाही विलंब न करता बाबर आझमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर प्लेइंग 11 बाबत सांगताना बाबर आझम म्हणाला की, इफ्तिखार अहमदच्या जागी सैम अय्यूबला संधी दिली आहे. इफ्तिखार अहमदला एका व्हिडीओला लाईक करण्याची शिक्षा मिळाल्याची चर्चा आता रंगली आहे. इफ्तिखारने इमाद वसीम विरुद्ध व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओला लाईक केलं होतं.

इमादने भारताविरुद्ध संथगतीने खेळला होता आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इफ्तिखार अहमदने हा व्हिडीओला लाईक केलं होतं. त्यानंतर ते लाईक काढलं. दुसरीकडे, इफ्तिखार अहमद टी20 वर्ल्डकपमध्ये काही खास करू शकलेला नाही. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरला. अमेरिकेविरुद्ध 18 आणि भारताविरुद्ध 5 धावा केल्या. दुसरीकडे सैम अय्यूब ओपनिंग करताना दिसणार आहे. तर बाबर आझम वन डाऊन उतरणार आहे.

पाकिस्तान आता उरलेल्या दोन पैकी एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं तर गाशा गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई आहे. दुसरीकडे अमेरिका आणि भारताच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागणार आहे. या दोन्ही संघाच्या कामगिरीत काही गडबड झाली तरच पाकिस्तानला संधी मिळू शकते.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कॅनडा (प्लेइंग इलेव्हन): आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), रविंदरपाल सिंग, साद बिन जफर (कर्णधार), डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी, जेरेमी गॉर्डन.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सैम अयुब, बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अमीर.

Non Stop LIVE Update
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.