AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 व्या वर्षी पदार्पणातच 73 धावा ठोकल्या, मग दहशतवाद्यांनी थेट बंदूक चालवून बॅटिंग रोखली

एखादा खेळाडू अर्धशतक बनवून खेळत असेल आणि अशावेळी दहशतवाद्यांमुळे त्याला फलंदाजी करणे थांबवावे लागले तर...वाचा कधी आणि कोणासोबत असं झालं होतं.

16 व्या वर्षी पदार्पणातच 73 धावा ठोकल्या, मग दहशतवाद्यांनी थेट बंदूक चालवून बॅटिंग रोखली
ind vs pak
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 12:53 PM
Share

लाहोर : अवघ्या 16 वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्या सामन्यापासून संघासाठी महत्त्वाची खेळी करण्यास सुरुवात केली. एक सलामीवीर म्हणून संघासाठी महत्त्वाची कामगिरी पार पाडली. पण एका महत्त्वाच्या खेळीमध्ये दहशतवाद्यांनी व्यत्यय आणला. हे घडलंय पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) सलामीवीर खुर्रम मंजूर (Khurram Manzoor) याच्यासोबत. खुर्रमचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म 10 जून 1986 रोजी कराची येथे झाला आहे. तर नेमक कसं दहशतवाद्यांमुळे खुर्रमचा महत्त्वाचा सामना बिघडला ते जाणून घेऊया. (Pakistani Cricketer khurram Manzoor Birthday Today he Debuted in 16 year)

गोष्ट आहे 2009 ची जेव्हा श्रीलंकेचा क्रिकेट संघ पाकिस्‍तानच्या दौऱ्यावर होता. 1 मार्चपासून कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीला लाहोरमध्ये सुरुवात झाली होती. श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत 606 धावांचा डोंगर उभा केला. थिलन समरवीराने (Thilan Samaraweera) 214, तिलकरत्‍ने दिलशानने (Tilakratne Dilshan) 145 रन आणि कुमार संगकाराच्या (Kumar Sangakkara) 104 धावांच्या जोरावर ही मोठी धावसंख्या श्रीलंका संघाने बनवली. पाकिस्‍तानने आपली पाळी येताच सलमान बट (Salman butt) आणि खुर्रम मंजूरच्या मदतीने बचावात्मक सुरुवात केली.

दहशतवादी हल्ल्यामुळे सामना रद्द

श्रीलंकेच्या 606 धावांचा पाठलाग करताना पाकिस्‍तानची 1 बाद 110 अशी स्थिती होती. सलमान बट 74 चेंडूक 48 धावा करुन रनआऊट झाला. पण खुर्रम मात्र 59 धावांवर नाबाद होता. त्याने 71 चेंडूत 11 चौकार लगावले होते. पण अशाच स्थितीत दुसऱ्या दिवशी श्रीलंकन संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात श्रीलंकेचे काही खेळाडू गंभीर जखमी झाले. त्यामुळे तो उर्वरीत दौरा रद्द करुन श्रीलंकन संघ मायदेशी परतला. त्यामुळे खुर्रम 59 धावांवर नाबाद राहिला आणि एक महत्त्वाच्या खेळापासून दहशतवाद्यांमुळे मुकला.

ऑस्‍ट्रेलिया विरोधात सहा तास क्रिजवर

खुर्रमने 2009-10 च्या सुमारास ऑस्‍ट्रेलिया दौऱ्यावर होबार्ट कसोटीमध्ये सहा तास क्रिजवर राहून चिवट फलंदाजी केली होती. पाकिस्तान तो सामना पराभूत झाला असला तरी खुर्रमची चिवट झुंज मात्र वाखाणण्याजोगी होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात ऑक्टोबर 2013 मध्ये खुर्रमने अबु धाबीमध्ये 146 धावांची धडाकेबाज खेळी केली. पाकिस्‍तानने सामनाही सात विकेट्सने जिंकला. खुर्रमची ही सर्वोत्कृष्ठ खेळी होती. आपल्या कारकिर्दीत खुर्रमने पाकिस्‍तानसाठी 16 कसोटी सामन्यांत 28.17 च्या सरासरीने 817 रन्स केला आहेत. ज्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. तर 7 एकदिवसीय सामन्यांत 33.71 च्या सरासरीने 236 धावा केल्या आहेत.

हे ही वाचा –

रोहित शर्माला घाबरला ‘हा’ पाकिस्‍तानी गोलंदाज, म्हणतो त्याच्यासारखे शॉट्स तोच खेळू शकतो

WTC फायनलचं मैदान कोण मारणार, भारत की न्यूझीलंड?, ब्रेट ली म्हणतो…

WTC Final पूर्वी टीम इंडियावर निर्बंध, साऊथहॅम्प्टनमध्ये खेळाडूंना एकमेकांना भेटण्यासही मज्जाव

(Pakistani Cricketer khurram Manzoor Birthday Today he Debuted in 16 year)

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं