
पाकिस्तान देश हा दहशतवादी चालवतात यावर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मोहोर लागली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जसाच तसं उत्तर दिलं. तसेच सर्व संबंध तोडून टाकले आहेत. आता दोन्ही देशात क्रिकेटही खेळलं जात नाही. आयसीसी आणि आशिया स्पर्धेतच भारतीय पाकिस्तानविरुद्ध सामने खेळतो. असं असताना काही वर्षांपूर्वी दोन्ही देशात स्पर्धा होत होत्या. तेव्हा पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू भारतीय मुलीच्या प्रेमात पडला. हा क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून जहीर अब्बास आहे. त्याला पाकिस्तान डॉन ब्रॅडमन म्हणून ओळखलं जात होते. पण भारतीय मुलीच्या प्रेमात इतका आकांत डुबला की त्याने पहिल्या पत्नीला तलाक दिला. तीन मुली असताना त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. तसेच रीता लूथरासोबत निकाह केला. या निकाहासाठी रिताने आपला धर्मही बदलला. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर 1988 मध्ये दोघांनी निकाह केला.
जहीर अब्बास आणि रीता लूथरा यांची पहिली भेट इंग्लंडमध्ये झाली होती. त्यावेळेस जहीर इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत होता. ग्लूस्टरशर संघाचा भाग होता. तर रीता लूथर इंटीरियर डिझाईनचा अभ्यास करत होती. रीता आणि जहीरची पहिली भेट झाली त्यातच तो भाळला. त्याने तिच्याशी निकाह करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी मिडिया रिपोर्टनुसार, जहीर अब्बासचे वडील आणि रीता लूथराचे वडील मित्र होते. रीताचे कुटुंब पहिल्यांदा पाकिस्तानच्या फैसलाबादमध्ये राहात होते. पण फाळणीनंतर रीताचं कुटुंब भारतात आलं. धर्मांतरानंतर रिताचं नाव समिना झालं. समीना ही एक यशस्वी व्यावसायिक असून कोट्यवधी रुपयांचा इंटीरियर डिझायनिंग व्यवसाय चालवते.
पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतीय तरूणींशी निकाह करण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतीय तरूणींशी निकाह केला आहे. पाकिस्तानचा क्रिकेटर मोहसिन खान याने बॉलिवूड अभिनेत्री रीन रॉय हिच्याशी विवाह केला होता. तर शोएब मलिकने टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत गाठ बांधली होती. पण हे दोन्ही संसार मोडले. नुकतंच वेगवान गोलंदाज हसन अलीने हरियाणाच्या मेवातमध्ये राहणाऱ्या सामिया आरजूशी निकाह केला. दोघांचा संसार सुरु आहे.