AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAKvsIND Asia Cup 2023 : रोहित शर्मा मोठ्या धर्मसंकटात, हिटमॅनला काळीज जड करून तो निर्णय घ्यावाच लागणार

IND vs PAK : आशिया कपमधील सर्वात हाय-व्होल्टेज सामना आज होणार आहे. या सामन्यासाठी संघ निवडताना रोहित शर्मा मोठ्या धर्मसंकटात सापडला आहे. मात्र त्याला एक कोणता तरी निर्णय घ्यावा लागणार आहे.

PAKvsIND Asia Cup 2023 : रोहित शर्मा मोठ्या धर्मसंकटात, हिटमॅनला काळीज जड करून तो निर्णय घ्यावाच लागणार
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 02, 2023 | 7:42 AM
Share

मुंबई : आशिया कप 2023 मधील आज तिसरा हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. (IND VS PAK ASIA CUP 2023) या सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींंचं लक्ष लागलेलं आहे. वन डे क्रिकेट फॉरमॅटमध्ये 2019 नंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. पाकिस्तान संघाने सामन्याच्या 19 तास आधी आपली प्लेइंग 11 जाहीर केली आहे. आजच्या सामन्यात (CAPTAIN ROHIT SHARMA) रोहित शर्मा आणि टीम व्यवस्थापनासमोर प्लइंग 11 जाहीर करताना मोठे निर्णय घ्यावे लागणार आहेत. मिडल ऑर्डरमध्ये दोन मुंबईकर खेळडूंपैकी एकालाच संघात स्थान देण्यात येणार आहे.

रोहित कोणाला देणार संंधी?

टीम इंडियाकडून ओपनिंगला रोहित शर्मासोबत शुबमन गिल, त्यानंतर विराट कोहली हे खेळाडू फिक्स असतील पण त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये मिस्टर 360 प्लेअर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यामध्ये कोणाला संधी द्यायची हा मोठा निर्णय रोहित शर्मासह टीम मॅनेजमेंटला घ्यावा लागणार आहे.  के. एल. राहुल सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये खेळणार नसल्याने ईशान किशन कीपर म्हणून फिक्स असणार त्यामुळे रोहित शर्मा मोठ्या धर्मसंकटात सापडला असावा.

सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या दोघांपैकी श्रेयसचं पारडं जड मानलं जात आहे. कारणस वन डे क्रिकेट फॉरमॅटमध्ये सूर्याची बॅट अजूनही म्हणावी अशी चालताना दिसली नाही. तर श्रेयस दुखापतीतून कमबॅक करत असून त्याची मिडल ऑर्डरमध्ये आकडेवारी चांगली आहे. मात्र अनेक दिवसांनी तो मैदानावर येणार असल्याने व्यवस्थापन कोणता तरी एक निर्णय घेईल.

पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रऊफ.

भारत संपूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या (VC), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराज, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन

Follow Us
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट..
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट कारवाई
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास बंदी; मोठं कारण समोर?
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन!