
आयपीएल 2025 मधील क्वालिफाय-2 सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमेनसामने आहेत. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहचणार आहे. क्वालिफायर-2 मध्ये जिंकणारा संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध आयपीएल ट्रॉफीसाठी भिडणार आहे. त्याआधी पंजाब किंग्सने मुंबई विरुद्ध टॉस जिंकला. कर्णधार श्रेयस अय्यर याने मुंबईला बॅटिंगसाठी बोलावलं आहे. मात्र कॅप्टन श्रेयसने टॉस जिंकताच मोठी घोडचूक केली. त्यामुळे पंजाबला याचे परिणाम भोगावे लागू शकतात.
आयपीएलच्या 18 व्या मोसामात याआधी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एकूण 7 सामने खेळवण्यात आले. या 7 पैकी 6 सामन्यांमध्ये पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर फक्त एकच संघ या हंगामात विजयी धावांचा पाठलाग करताना यशस्वी ठरली आहे. त्यामुळे आकडेवारी पाहता नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पहिले बॅटिंग करणं फायदेशी आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या स्टेडियममध्ये 18 व्या मोसमात पहिल्या डावातील 221 ही सरासरी धावसंख्या आहे. मात्र हे सर्व माहित असूनही श्रेयस अय्यर याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता श्रेयसचा निर्णय योग्य ठरणार की आकडेवारीनुसार पलटण मैदान मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान टॉसनंतर चाहत्यांना सामना सुरु होण्याची प्रतिक्षा होती. मुंबईचे चाहते रोहितची बॅटिंग पाहण्यासाठी सज्ज होते. मात्र सामन्याच्या काही मिनिटांआधी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सामन्याला सुरुवात होऊ शकली नाही. त्यानंतर काही वेळेनी पाऊस थांबला. त्यामुळे सामना सुरु होणार, असं जाहीर करण्यात आलं. मात्र पुन्हा पावसाने सुरुवात केली. त्यानंतर पावसाने उसंत घेतल्यानंतर आता खेळपट्टी कोरडी होण्यासाठी ग्राउंड स्टाफकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मात्र यात आतापर्यंत 80 मिनिटांचा खेळ वाया गेला आहे. मात्र त्यानंतरही ओव्हर कमी करण्यात येणार नाहीत. प्लेऑफमधील सामन्यांसाठी 2 तासांचा अधिक वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे रात्री 9 वाजून 30 मिनिटांपर्यंत ओव्हर कमी करण्यात येणार नाहीत.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कॅप्टन), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अझमतुल्लाह ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि रीस टोपली.