
राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सलामीवीर आणि युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) याला आयपीएलच्या 18 व्या मोसमात (Ipl 2025) खेळताना पहिल्या 3 सामन्यात खास काही करता आलं नाही. यशस्वी या 3 सामन्यांमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे यशस्वीवर टीका करण्यात आली. यशस्वीच्या कामगिरीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र सलग 3 सामन्यानंतर अखेर यशस्वीला सूर गवसला आहे. यशस्वीने पंजाब किंग्सविरुद्ध (Punjab Kings) अर्धशतकी खेळी करत टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे. यशस्वीचं हे या मोसमातील पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं.
यशस्वीला या मोसमात खास सुरुवात करता आली नाही. यशस्वीने मोहिमेतील पहिल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध अवघी 1 धाव केली. त्यानंतर यशस्वीने केकेआरविरुद्ध 29 धावा केल्या. यशस्वीला या सामन्यात मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र यशस्वीला केकेआरने रोखलं. तर यशस्वीने चेन्नईविरुद्ध 4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. यशस्वीने अशाप्रकारे पहिल्या 3 सामन्यांत एकूण 34 धावा केल्या. त्यामुळे यशस्वीवर कुठेतरी धावा करुन कमबॅक करण्याचं दडपण होतं. यशस्वीने पंजाबविरुद्ध संधी साधली आणि भरपाई केली.
यशस्वीने पंजाबविरुद्ध 45 चेंडूत 148.89 च्या स्ट्राईक रेटने 67 धावा केल्या. यशस्वीने त्यापैकी 42 धावा या फक्त 8 चेंडूत चौकार आणि षटकाराद्वारे केल्या. यशस्वीने 5 सिक्स आणि 3 फोर ठोकले. तसेच यशस्वी कॅप्टन संजू सॅमसनसह 89 धावांची सलामी भागीदारी करत राजस्थानला अप्रतिम सुरुवात करुन दिली. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 204 धावा केल्या.
जयस्वालची पंजाबविरुद्ध ‘यशस्वी’ खेळी
Finding his groove 🔝 😎
Yashasvi Jaiswal notched up his first 5️⃣0️⃣ of the season in style 🩷
He departs for a well-made 67(45).
Updates ▶ https://t.co/kjdEJydDWe#TATAIPL | #PBKSvRR | @ybj_19 pic.twitter.com/byXYSOKJ4o
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2025
पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहल.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, युद्धवीर सिंग चरक आणि संदीप शर्मा.