IND vs PAK : भारताच्या बाबतीत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे म्हणतय, ते करुन दाखवण्याची धमक त्यांच्यात खरंच आहे का?

IND vs PAK : बहरीनमध्ये झालेली एशियन क्रिकेट काऊन्सिलची बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली. आशिया कप 2023 स्पर्धेच यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण भारताने पाकिस्तानात येण्यास नकार दिला आहे.

IND vs PAK : भारताच्या बाबतीत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे म्हणतय, ते करुन दाखवण्याची धमक त्यांच्यात खरंच आहे का?
ind vs pakImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 2:57 PM

Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धा होणार एवढं निश्चित आहे. पण ही टुर्नामेंट कुठे होणार? याबद्दल सस्पेन्स कायम आहे. पुढच्या महिन्यात मार्च 2023 मध्ये यावर अंतिम निर्णय होईल. बहरीनमध्ये झालेली एशियन क्रिकेट काऊन्सिलची बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली. आशिया कप 2023 स्पर्धेच यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण भारताने पाकिस्तानात येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या यजमानपदावर टांगती तलवार आहे. भारताच्या ठाम भूमिकेमुळे टेन्शनमध्ये आलेल्या पाकिस्तानने पुन्हा जुना राग दिला आहे.

पाकिस्तानने काय म्हटलं?

भारत टुर्नामेंटसाठी पाकिस्तानात येणार नसेल, तर पाकिस्तानही वनडे वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार नाही, असं पाकिस्तान क्रिकेटचे प्रमुख नजम सेठी यांनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना सांगितलं. सूत्रांनी ही माहिती दिलीय. पाकिस्तान क्रीडा पत्रकारांचे टि्वटही याकडे इशारा करतायत.

न्यूट्रल वेन्यु कुठे आहे?

भारताने येणार नसल्याच स्पष्ट केल्यानंतर आशिया कप पाकिस्तान बाहेर आयोजित करण्याच्या चर्चेने जोर पकडलाय. या संदर्भात अजून कोणतही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. टुर्नामेंटच आयोजन पाकिस्तानात झालं नाही, तर न्यूट्रल वेन्युवर आशिया कपच आयोजन होऊ शकतं. याचाच अर्थ यूएई किंवा कतारमध्ये आशिया कप क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते.

टुर्नामेंट पाकिस्तान बाहेर आयोजित करण्याचा अंतिम निर्णय तिथल्या सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतरच घेतला जाईल, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एशियन क्रिकेट काऊन्सिलच्या बैठकीत सांगितलं. वेन्यूबद्दल अंतिम निर्णय कधी होणार?

आशिया कपसाठी वेन्यू निश्चित करण्याची डेडलाइन मार्च आहे. पुढच्या महिन्यात एक्ज्यूकिटिव बोर्डाच्या मीटिंगमध्ये यावर शिक्कामोर्तब होईल. मार्च महिन्यातल्या बैठकीत ठरलं नाही, तर पुढे काय होणार? त्याची उत्सुक्ता असेल. आशिया कपचा वेन्यू बदलला, मग पाकिस्तान काय करणार ते पहायचय. वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार नाही, हे पाकिस्तानने एकदा-दोनदा नव्हे, तिनदा सांगितलय. पाकिस्तान भारतात वनडे वर्ल्ड कपसाठी न येण्याच्या आपल्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिलं का? हा प्रश्न आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.