AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर तसं झालं नाही तर….! आशिया कप स्पर्धेत पुढचे सामने खेळणार नाही, पाकिस्तानचा निर्णय

भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतर घडलेलं हँडशेक प्रकरण आता चांगलंच गाजत आहे. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली आहे. यात एक तक्रार सामनाधिकाऱ्यांच्या विरोधात आहे. इतकंच काय तर भारताविरुद्ध पुढचा सामना खेळणार नाही अशी धमकीही दिली आहे.

जर तसं झालं नाही तर....! आशिया कप स्पर्धेत पुढचे सामने खेळणार नाही, पाकिस्तानचा निर्णय
जर तसं झालं नाही तर....! आशिया कप स्पर्धेत पुढचे सामने खेळणार नाही, पाकिस्तानचा निर्णयImage Credit source: ACC Twitter
| Updated on: Sep 15, 2025 | 9:02 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेतल्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानच्या चिंध्या उडवल्या. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तान 7 गडी आणि 25 चेंडू राखून धुव्वा उडवला. त्यात सामन्याआधी आणि सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्याने होती नव्हती ती सगळी लाज गेली. सामन्यानंतर पाकिस्तानी व्यवस्थापकाने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे तक्रार केली होती. आता हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे गेलं आहे. या तक्रारीत ज्यांच्याकडे सुरुवातीला तक्रार केली त्या अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. जर सामनाधिकाऱ्यांना काढलं नाही तर स्पर्धेतील इतर सामन्यांवर बहिष्कार टाकू असं स्पष्ट केलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आरोप केला की, पायक्रॉफ्टने नाणेफेकीवेळी दोन्ही संघांच्या कर्णधारांना स्पष्ट सांगितलं होतं की हस्तांदोलन करायचं नाही. याच मुद्द्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड दाद मागण्यासाठी आयसीसीच्या दारात गेलं आहे. या स्पर्धेतून सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. इतकंच काय तर त्यांना काढलं नाही तर या स्पर्धेतील इतर सामन्यांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. जिथे सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांची नियुक्ती असेल. दुसरीकडे, आयसीसीने पीसीबीच्या तक्रारीवर काहीच उत्तर दिलं नाही. इतकंच काय तर कारवाई देखील केली नाही.

दरम्यान, ही स्पर्धा आशियाई क्रिकेट परिषदेची आहे. त्यामुळे या स्पर्धेत आयसीसीचा कोणतीही भूमिका नाही. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जा प्राप्त स्पर्धा असल्याने सामनाधिकाऱ्यांची नियुक्ती आयसीसी करते. आशिया कप 2025 स्पर्धेसाठी आयसीसीने दोन सामनाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात पायक्रॉफ्ट आणि वेस्ट इंडिजचे रिची रिचर्डसन आहेत. पाकिस्तानचा पुढचा सामना 17 सप्टेंबरला युएईविरुद्ध होणार आहे. या सामन्यात सामनाधिकाऱ्याची भूमिका पायक्रॉफ्ट बजावणार आहेत. जर पायक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई केली नाही तर पाकिस्तानचा संघ पुढचा सामना खेळणार नाही.  हा सामना पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई आहे. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान संघ खेळला नाही तर स्पर्धेतून आऊट होईल. कारण सुपर 4 फेरीत जागा मिळवण्यासाठी हा सामना जिंकणं भाग आहे. 

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना