लाईव्ह सामन्यात खेळाडूंनी सर्व मर्यादा ओलांडल्या, भर मैदानात एकमेकांवर उचलला हात Watch Video

दक्षिण अफ्रिका इमर्जिंग संघ सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन्ही दोन कसोटी सामने खेळत आहेत. या सामन्यांना अधिकृत दर्जा नाही. पण असं असताना दुसऱ्या कसोटी सामन्यात विचित्र घटना पाहण्याचा योग प्रेक्षकांना आला. यावेळी दोन्ही खेळाडू भर मैदानात भिडल्याचं पाहायला मिळालं.

लाईव्ह सामन्यात खेळाडूंनी सर्व मर्यादा ओलांडल्या, भर मैदानात एकमेकांवर उचलला हात Watch Video
लाईव्ह सामन्यात दोन खेळाडूंनी सर्व मर्यादा ओलांडल्या
Image Credit source: Twitter
| Updated on: May 28, 2025 | 7:20 PM

क्रिकेट जगतात क्रीडाभावनेची उदाहरणं आपण अनेक वेळा पाहीली आहेत. तसेच एखाद्या क्रिकेटपटूला राग अनावर झाल्याचंही पाहीलं आहे. कधी कधी खेळाडूंमधील वाद इतका विकोपाला जातो की पुढे काय होणार याची चिंता लागून राहते. पण बांगलादेशमध्ये कसोटी सामन्यात एक असाच विचित्र प्रकार घडला. या सामन्यात दोन खेळाडू आमनेसामने आले आणि हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचलं. पण वेळीच पंचांनी हस्तक्षेप केला आणि प्रकरण निवळलं. सोशल मीडियावर या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दक्षिण अफ्रिका इमर्जिंग आणि बांग्लादेश इमर्जिंग यांच्यात ढाकाच्या शेरे बांग्ला आंतरराष्ट्रीय स्टेडियमध्ये सामना खेळला जात आहे. या सामन्यात हा प्रकार घडला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण अफ्रिकेचा त्शेपो न्तुली आणि बांगलादेशाच रिपन मंडल यांच्या वादावादी झाली. दोन्ही खेळाडू एकमेकांना धक्का देताना दिसले. प्रकरण इतकं वाढलं की रिपन मंडलने बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच पंचांनी हस्तक्षेप केला.

या सामन्यात नाणेफेकीचा कौल बांग्लादेश इमर्जिंगच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना हा प्रकार घडला. पण हा वाद का झाला याबाबतचं कारण स्पष्ट नाही. पण खेळाडूंमध्ये वाद झाला असावा आणि त्याचं रुपांतर हाणामारीपर्यंत येऊन पोहोचलं असावं. पण प्रकरण वाढण्याआधीच पंचांनी हस्तक्षेप केला आणि वाद निवळला. या दौऱ्यात दोन्ही संघ वनडे मालिकेत आमनेसामने आले होते. ही मालिका बांगलादेशने 2-1 ने जिंकली. आता दोन्ही संघ अनऑफिशियल कसोटी खेळत आहेत.

सामनाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असेल यात काही शंका नाही. पण सामना सुरु असल्याने तात्काळ काही कारवाई केली नाही. शिक्षा सुनावण्यापूर्वी प्रोटोकॉलनुसार मैदानी पंचाना अहवाल सादर करणं भाग आहे. ईएसपीएनक्रिकइंफो बातमीनुसार, सामनाधिकारी या सामन्याचा रिपोर्ट बीसीबी आणि सीएसए दोघांना सोपवला आहे. त्यांच्याकडून कारवाई होण्याची शक्यता अधिक आहे. या दौऱ्यातील हा शेवटचा सामना आहे.