AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi | पंतप्रधान मोदींच्या हस्ते क्रिकेटच्या नव्या स्टेडियमच भूमिपूजन, सचिनकडून जर्सी भेट

PM Modi | कुठे बनतय क्रिकेटच नवीन स्टेडियम?. पुढच्या दोन वर्षात एक नवीन क्रिकेट स्टेडियम बनून तयार होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या स्टेडियमच भूमिपूजन केलं. यावेळी अनेक दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते.

PM Modi | पंतप्रधान मोदींच्या हस्ते क्रिकेटच्या नव्या स्टेडियमच भूमिपूजन, सचिनकडून जर्सी भेट
New Cricket Stadium
| Updated on: Sep 23, 2023 | 3:07 PM
Share

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नव्या क्रिकेट स्टेडियमच भूमिपूजन झालं. माजी क्रिकेटपटू कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर आणि बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रमा दरम्यान सचिन तेंडुलकरने पीएम मोदी यांना NAMO लिहिलेली टीम इंडियाची जर्सी भेट दिली. “23 ऑगस्टला आपल्या चांद्रयान-3 च चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं. तिथे एक शिवशक्ती स्थान आहे. इथे सुद्धा शिवशक्तीच स्थान आहे. काशीमध्ये आज इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच भूमिपूजन करण्यात आलं. हे क्रिकेट स्टेडियम एक वरदान ठरेल” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काशीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. “युवकांसाठी हे स्टेडियम वरदान ठरेल. आज क्रिकेटच्या माध्यमातून जग भारताशी जोडलं जातय. या स्टेडियमच डिजाइन महादेवाला समर्पित आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

वाराणसीच्या गंजारीमध्ये इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम होणार आहे. आजच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा उपस्थित होते. “वाराणसीला येऊन जी अनुभूती मिळते, त्याच शब्दात वर्णन करता येणार नाही” असं मोदी म्हणाले. “आधी लोक आपल्या मुलांना अभ्यास कर म्हणून सांगायचे. मुलांवर अभ्यासाचा दबाव असायचा. आज देशातील वातावरण बदललय. लोक आपल्या मुलांना खेळण्यासाठी पाठवतायत. जेव्हा एखाद क्रिकेट स्टेडियम बनतं, तेव्हा फक्त त्या खेळावरच नाही, तर अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “राज्यातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवावं, एवढीच माझी इच्छा आहे. वाराणसीतील युवकांना उच्चस्तरीय खेळाची सुविधा मिळाली पाहिजे” असं मोदी यांनी सांगितलं. या स्टेडियमच्या निर्मितीवर 450 कोटी खर्च येणार आहे. किती एकरमध्ये असणार स्टेडियम?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या क्रिकेट स्टेडियमच भूमिपूजन केलं, ते काम 2025 मध्ये पूर्ण होईल. त्रिशुलच्या आकराचे फ्लडलाइट्स लावले जातील. डमरुच्या आकाराच मीडिया सेंटर असेल. अर्धचंद्रकार छत असेल. 31.6 एकरमध्ये स्टेडियमची निर्मिती होईल. 30 हजार प्रेक्षक क्षमता असेल. स्टेडियममध्ये सात पीच बनवले जातील.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...