
आयपीएल 2025 स्पर्धेतील 58वा सामना थांबवण्यात आला आहे. पाकिस्तानकडून वारंवार हल्ले होत आहेत. यामुळे खबरदारीचा इशारा म्हणून हा सामना थांबवण्यात आला आहे. हा सामना सीमेपासून 150 किमी दूर असलेल्या धर्मशाळेत सुरु होता. पण या मैदानावर हल्ला होऊ शकतो. या अनुषंगाने हा सामना थांबवण्यात आला अशी माहिती मिळत आहे. लाईट्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सामना थांबवण्यात आला आहे, अशी माहिती सुरुवातीला सांगत होते. पण मीडिया रिपोर्टनुसार, सीमेवरील स्थिती पाहता हा निर्णय घेतला. आयपीएल 2025 स्पर्धेतील 58वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु होता. 10.1 षटकांचा खेळ झाला होता. पंजाब किंग्सने 1 गडी गमवून 122 धावा केल्या होत्या. तितक्यात मैदानात ब्लॅकआऊट झाला आणि सामना थांबवण्यात आला. आता हा सामना रद्द करण्यात आल्याची आता माहिती समोर आली आहे. सद्यस्थिती पाहता सीमेलगत असलेल्या शहरात एकापाठोपाठ एक ब्लॅकआऊट केला जात आहे. तसेच पाकिस्तानकडून होणारे हल्ले भारताकडून परतवून लावले जात आहे. एअर डिफेंस सिस्टमच्या माध्यमातून सर्व हल्ले निष्फळ केले आहेत.
दरम्यान, मैदानावरील फ्लडलाइट्स पहिल्यांदा 9 वाजून 29 मिनिटांनी बंद करण्यात आले. यानंतर, खेळाडू आणि प्रेक्षक मैदानाबाहेर जाताना दिसले. ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, आयपीएल अधिकाऱ्यांना स्टेडियम रिकामे करण्यास सांगण्यात आले. यानंतर सामना थांबवण्यात आला आणि प्रेक्षकांना स्टेडियम रिकामे करण्यास सांगण्यात आले होते. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणारा सामना सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआयकडून अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
IPL chairman Arun Dhumal requesting fans to leave the stadium as soon as possible at Dharamshala. pic.twitter.com/1Pj0H7I5cc
— Tanuj (@ImTanujSingh) May 8, 2025
या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी घेतली. हा सामना पावसामुळे एक तास उशिराने सुरु झाला होता. पंजाबकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 122 धावांची भागीदारी केली. प्रियांश आर्यची विकेट पडली आणि श्रेयस अय्यर मैदानात आला. पण तेव्हाच सामना थांबवण्यात आला. प्रियांश आर्यने 34 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकार मारत 70 धावांची खेळी केली. तर प्रभसिमरन सिंगने 28 चेंडूत 7 चौकाराच्या मदतीने नाबाद 50 धावांची खेळी आहे.