T20 World Cup: भल्याभल्यांना फिरकीच्या तालावर नाचवणाऱ्या अश्विनचं 4 वर्षांनी संघात पुनरागमन, रोहित म्हणतो, ‘तो असल्यावर…’

| Updated on: Nov 04, 2021 | 1:23 PM

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात अश्विनला तब्बल चार वर्षानंतर भारताच्या टी ट्वेन्टी संघात संधी मिळाली. अश्विनने अफगाणिस्तानविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकात 14 धावा देत 2 बळी घेतले.

T20 World Cup: भल्याभल्यांना फिरकीच्या तालावर नाचवणाऱ्या अश्विनचं 4 वर्षांनी संघात पुनरागमन, रोहित म्हणतो, तो असल्यावर...
आर अश्विन
Follow us on

T20 World Cup: ICC T20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताला आधी पाकिस्तानने आणि नंतर न्यूझीलंडकडून पराभूत व्हावं लागलं. या दोन्ही सामन्यांमध्ये संघाच्या प्लेईंग 11 मध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले… यात एका नावाची सतत चर्चा होत होती, तो खेळाडू होता, रविचंद्रन अश्विन…! अश्विनच्या जागी मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला पसंती दिली गेली. मात्र तो जखमी झाल्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात अश्विनला तब्बल चार वर्षानंतर भारताच्या टी ट्वेन्टी संघात संधी मिळाली. अश्विनने अफगाणिस्तानविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकात 14 धावा देत दोन बळी घेतले. संपूर्ण संघ त्याच्या कामगिरीवर खूश आहे. संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने तर त्याचं तोंडभरुन कौतुक केलंय. रविचंद्रन अश्विनची संघात असला की संघाला ताकद मिळते. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची उपस्थिती नेहमीच संघाला फायदेशीर ठरते कारण हा अनुभवी ऑफस्पिनर नेहमीच विकेटच्या शोधात असतो, असं रोहित म्हणाला.

त्याच्यासाठी आव्हान होतं, पण तो हुशार आणि चतुर, त्याने आव्हान पेललं!

अफगाणिस्तानच्या सामन्याअगोदर अश्विनने 2017 मध्ये भारतासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता. चार वर्षांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या अश्विनने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून पुन्हा एकदा आपलं कर्तृत्व सिद्ध करुन दाखवलं. अश्विनने विश्वचषकातील सराव सामन्यांमध्येही चमकदार कामगिरी केली होती. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने 4 षटकांत 23 धावा दिल्या मात्र त्याला विकेट घेता आली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 2 षटके टाकली आणि आठ धावांत 2 गडी बाद केले.

रोहितने म्हणाला, ”तो एक महान गोलंदाज आहे. यात कोणतीही शंका नाही. त्याने खूप क्रिकेट खेळलंय. अनेक विकेट्स घेतल्या आहेत. जवळपास चार वर्षांनी तो टी ट्वेन्टी क्रिकेट खेळत असल्यामुळे त्याच्यासाठी हे आव्हान असणार आहे हे त्याला माहिती होते परंतु तो खूप चतुर आणि हुशार आहे. त्याने ते आव्हान बरोबर पेललं.

आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन

अश्विन आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-20 खेळत नसला तरी आयपीएलमध्ये तो सतत चांगलं प्रदर्शन करत होता. तो आधी पंजाब किंग्जचा कर्णधार होता आणि आता तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळत आहे. रोहित म्हणाला, “तो नेहमी विकेटच्या शोधात असतो आणि त्याच्यासारखा खेळाडू संघात असणे फायदेशीर आहे. त्याला त्याची बोलिंग स्ट्रेन्थ चांगली समजते आणि त्याने आयपीएलमध्येही चमकदार गोलंदाजी केली आहे. आशा आहे की तो भविष्यातही अशीच गोलंदाजी करत राहील.

(r ashwin always look for wickets says Rohit sharma t20 world cup 2021)

संबंधित बातम्या

सुरुवातीच्या 2 सामन्यात का हरलो, आताच का जिंकलो, रोहित शर्माने एक एक करुन सगळं सांगितलं!

अश्विनची ‘तारीख पे तारीख’, 52 वी टी ट्वेन्टी विकेट घेण्यासाठी जवळपास 4 वर्ष, वाट पाहता पाहता धोनी मेन्टॉर बनला!

अश्विनची ‘तारीख पे तारीख’, 52 वी टी ट्वेन्टी विकेट घेण्यासाठी जवळपास 4 वर्ष, वाट पाहता पाहता धोनी मेन्टॉर बनला!