IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत आर अश्विन याची सरप्राइज एन्ट्री, निवड समितीने का घेतला असा निर्णय

IND vs AUS : भारताने आशिया कप जेतेपदावर नाव कोरल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. वनडे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियामध्ये आर अश्विन याची निवड झाली आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत आर अश्विन याची सरप्राइज एन्ट्री, निवड समितीने का घेतला असा निर्णय
IND vs AUS : आर. अश्विन याला वनडे वर्ल्डकप पूर्वी होणाऱ्या मालिकेत मिळालं स्थान, नेमकं काय घडलं असं ते जाणून घ्या
| Updated on: Sep 18, 2023 | 9:15 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकपपूर्वी रंगीत तालिम म्हणून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिका होणार आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी केएल राहुल याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याचं पुनरागमन होणार आहे. विराट कोहली आणि कुलदीप यादव यालाही पहिल्या दोन सामन्यात आराम देण्यात आला आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे आर. अश्विन याचं संघात पुनरागमन झालं आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप संघात पुनरागमन करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. वनडे सामन्यात आर. अश्विन याने 20 महिन्यानंतर पुनरागमन केलं आहे.

अक्षर पटेल जखमी असल्याने निवड समितीने त्याच्यासाठी पर्याय ठेवण्याचा निर्ण घेतला आहे. जर दुखापतीतून सावरला नाही तर आर. अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यापैकी एकाला संघात स्थान मिळू शकते. आर. अश्विन हा पहिली पसंती असणार आहे. त्यामुळे आर. अश्विनला वनडे वर्ल्डकप खेळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 सप्टेंबरपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जाणार आहे. 24 सप्टेंबरला दुसरा सामना खेळला जाणार आहे. तिसरा सामना 27 सप्टेंबरला सौराष्ट्र येथे होणार आहे.

पहिल्या दोन सामन्यासाठी टीम इंडिया

केएल राहुल (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, वाशिंगटन सुंदर

तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल,  कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन

वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, एलेक्स कॅरी, शॉन एब, नाथ एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, जॉश इंग्लिस, स्पेंसर जॉनसन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, ॲडम जंपा.