Radha Yadav कडून क्रिकेट इतिहासातील अद्भूत कॅच, रैना-जडेजालाही विसराल, पाहा व्हीडिओ

What A Catch Radha Yadav : राधा यादवने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अद्भूत, अप्रितम आणि अफलातून असा कॅच घेतला आहे. पाहा राधाच्या या कॅचचा व्हीडिओ.

Radha Yadav कडून क्रिकेट इतिहासातील अद्भूत कॅच, रैना-जडेजालाही विसराल, पाहा व्हीडिओ
Radha Yadav catch video IND W vs NZ W 2nd ODI
Image Credit source: bcci women X Account
| Updated on: Oct 27, 2024 | 7:12 PM

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाची राधा यादव ही सर्वोत्तम फिल्डरपैकी एक आहे, ही तिने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. राधाने या सामन्यात बॉलिंगसह फील्डिंगनेही शानदार कामगिरी केली. राधाने या दुसऱ्या वनडेत अप्रतिम कॅच घेतला आणि ब्रूक हॅलिडे हीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. राधाच्या या कॅचचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राधाने न्यूझीलंडच्या डावातील 32 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर हा अफलातून कॅच घेतला. प्रिया मिश्रा ही 32 वी ओव्हर टाकत होती. प्रियाने या ओव्हरमधील टाकलेल्या तिसऱ्या बॉलवर ब्रूक हॅलिडे फटका मारला. राधाने मिड ऑफच्या उलट दिशेन धावत हवेत झेप घेत हा महिला क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कॅच घेतला. राधाच्या या अप्रतिम कॅचनंतर सारेच थक्क झाले. राधाच्या या कॅचमुळे ब्रूक हीला मैदानाबाहेर जावं लागलं. ब्रूकने 15 बॉलमध्ये 8 रन्स केल्या.

राधा यादवने फिल्डिंगमध्ये योगदान देण्यासह अप्रतिम बॉलिंग केली. राधाने 10 ओव्हर टाकल्या. राधाने या 10 षटकांमध्ये 6.90 च्या इकॉनॉमीने 69 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. राधाने सुझी बेट्स, सोफी डिव्हाईन, मॅडी ग्रीन आणि ली ताहुहु या चौघांची शिकार केली. तर दीप्ती शर्मा हीने 2 आणि साईमा ठाकुर हीने 1 विकेट घेत राधाला अप्रतिम साथ दिली.

भारतासमोर 260 धावांचं आव्हान

दरम्यान न्यूझीलंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे न्यूझीलंडला या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्यातीह परिस्थितीत हा दुसरा सामना जिंकायचा आहे. न्यूझीलंडने भारतासमोर 260 धावांचं आव्हान दिलं आहे.आता टीम इंडिया या धावा करत मालिका जिंकते की न्यूझीलंड बरोबरी करण्यात यशस्वी ठरते? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

राधा यादवकडून अद्भूत, अप्रतिम आणि अफलातून कॅच

वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, सायमा ठाकोर आणि प्रिया मिश्रा.

वूमन्स न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : सोफी डेव्हाईन (कॅप्टन), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, लॉरेन डाउन, ब्रूक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गझ (विकेटकीपर), जेस केर, ली ताहुहू, ईडन कार्सन आणि फ्रॅन जोनास.