AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: राजस्थान रॉयल्सचा मॅनेजर रोमी भिंडरला मिळाली अशी शिक्षा, वैभव सूर्यवंशीचं काय?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मॅनेजर रोमी भिंडर हा डगआऊटजवळ मोबाईल वापरताना दिसला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. आता त्याची उलटतपासणी झाली असून काय झालं ते जाणून घेऊयात

IPL 2026: राजस्थान रॉयल्सचा मॅनेजर रोमी भिंडरला मिळाली अशी शिक्षा, वैभव सूर्यवंशीचं काय?
IPL 2026: राजस्थान रॉयल्सचा मॅनेजर रोमी भिंडरला मिळाली अशी शिक्षा, वैभव सूर्यवंशीचं काय?Image Credit source: X
| Updated on: Apr 17, 2026 | 4:37 PM
Share

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीला पराभवाची धूळ चारली होती. पण या सामन्याची चर्चा अजूनही रंगली आहे. त्याला कारण म्हणजे लाईव्ह सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मॅनेजर रोमी भिंडर मोबाईल फोन वापरताना दिसला होता. त्यानंतर क्रीडावर्तुळात या वर्तनाबाबत जोरदार चर्चा रंगली होती. इतकंत काय तर सोशल मीडियावरही वाभाडे काढण्यात आले होते. त्यानंतर बीसीसीआयने या प्रकरणाची तपासणी सुरू केली होती. आता ही तपासणी पूर्ण झाली असून यात रोमी भिंडरला आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच अशी कृती पुन्हा होणार नाही, याची हमी घेतली आहे. तर त्याच्या बाजूला बसलेला 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला या प्रकरणातून सुटला आहे. त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

आयपीएल 2026 स्पर्धेत 10 एप्रिलला राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात गुवाहाटीत सामना पार पडला होता. राजस्थान रॉयल्स फलंदाजी करत असताना रोमी भिंडर मोबाईलवर काही तरी करताना दिसला. डगआऊट जवळ बसून तो हे काम करत होता. खरं तर मॅनेजरला ड्रेसिंग रूममध्ये मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी असते. पण डगआऊटमध्ये असं करणं सक्त मनाई आहे. त्यामुळे रोमी भिंडरविरुद्ध कारवाई करण्यात आली. रोमी भिंडरला दंड भरावा लागला असला तरी अँटी करप्शन युनिटने त्याला भ्रष्टाचार प्रकरणात क्लीन चिट दिली आहे.

रोमी भिंडर मोबाईल का घेऊन आला होता?

रोमी भिंडर डगआऊट जवळ मोबाईल वापरण्यासाठी बीसीसीआयची परवानगी घेतल्याचं समोर आलं आहे. आरोग्याच्या कारणास्तव त्यांना ही सूट मिळाली होती. आयपीएल स्पर्धेपूर्वी भिंडर आजारी होते आणि फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज देत होते. त्यांनी बराच काळ आयसीयूत घालवला होता. आरोग्याच्या कारणास्तव त्यांना डॉक्टरांचा मोबाईलवर सल्ला घ्यावा लागतो. असं असलं तरी डगआऊटजवळ मोबाईल वापरल्याने नियमाचं उल्लंघन मानलं गेलं आहे. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला गेला आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या