AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL फ्रेंचायजी एका मोठ्या टीमच्या खेळाडूला पळवण्याच्या तयारीत, थेट मालामाल करणारी मोठी ऑफर

IPL : फ्रेंचायजीकडून मिळणारा पैसा पाहता, जगातील टॉपचे क्रिकेटर आपल्या देशाच्या बोर्डासोबतचा करार तोडण्याच पाऊल उचलू शकतात. आयपीएलमुळे लकवरच क्रिकेटमध्ये नवीन अध्याय लिहिला जाईल.

IPL फ्रेंचायजी एका मोठ्या टीमच्या खेळाडूला पळवण्याच्या तयारीत, थेट मालामाल करणारी मोठी ऑफर
इंडियन प्रीमियर 2023 स्पर्दा संपल्यानंतर आता आयपीएल 2024 बाबत चर्चा सुरू झाली आहे.
| Updated on: Jun 30, 2023 | 1:38 PM
Share

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगमधील फ्रेंचायजी राजस्थान रॉयल्स एक मोठा गेम खेळण्याच्या तयारीत आहे. संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने इंग्लंडच्या एक मोठ्या प्लेयरला आपल्यासोबत जोडण्याच प्लानिंग केलय. राजस्थान फ्रेंचायजीने इंग्लंडच्या वनडे आणि T20 टीमचा कॅप्टन जोस बटलरला कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली आहे. ब्रिटीश वर्तमानपत्र टेलिग्राफने गुरुवारी या बद्दल माहिती दिली.

जोस बटलरने इंडियन प्रीमिअर लीगची फ्रेंचायजी राजस्थान रॉयल्सची ही ऑफर स्वीकारली, तर त्याला इंग्लंड बोर्डासोबतचा कॉन्ट्रॅक्ट तोडावा लागेल.

यामध्ये काय धोका?

आयपीएलमधील बहुतांश फ्रेंजायजींनी जगभरातील वेगवेगळ्या T20 लीगमध्ये टीम विकत घेतल्या आहेत. फ्रेंचायजीकडून मिळणारा पैसा पाहता, जगातील टॉपचे क्रिकेटर आपल्या देशाच्या बोर्डासोबतचा करार तोडण्याच पाऊल उचलू शकतात. राजस्थान रॉयल्सला बटलरसोबत दीर्घकालीन करार करायचा आहे. पण याचा प्रस्ताव त्यांनी अजून दिलेला नाही.

हा प्रस्ताव मान्य आहे किंवा, नाही ते….

जोस बटलर इंग्लंडच्या वनडे आणि T20 टीमचा कॅप्टन आहे. त्याला 4 वर्षांसाठी करारबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. अजूनपर्यंत अधिकृतपणे असा प्रस्ताव दिलेला नाही. जोस बटलरला हा प्रस्ताव मान्य आहे किंवा, नाही ते लवकरच समजेल.

ऑक्शनमध्ये किती कोटीची बोली लागलेली

बटलर 2018 पासून राजस्थान रॉयल्सकडून खेळतोय. त्याने 71 सामन्यात 18 हाफ सेंच्युरी आणि पाच शतक झळकावली आहेत. दक्षिण आफ्रिकेतील टी 20 लीगमध्ये तो पार्ल रॉयल्स टीमसाठी सुद्धा खेळतो. IPL ऑक्शनमध्ये जोस बटलरवर 10 कोटी रुपयांची बोली लावून राजस्थान रॉयल्सने विकत घेतलं होतं. इंग्लंडच्याच जेसन रॉय बरोबर कोलकाता नाइट रायडर्सने अशी डील केलीय. त्यासाठी त्याने इंग्लंड बोर्डाच कॉन्ट्रॅक्टही सोडलं. आता KKR वेगवेगळ्या लीग्समध्ये खेळतेय,

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.