
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार बॅट्समन रजत पाटीदार याने मुंबई इंडियन्स विरुद्ध आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात अर्धशतक ठोकलं. रजतने गेराल्ड कोएत्झी याच्या बॉलिंगवर सलग 2 खणखणीत षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर तिसऱ्यात बॉलवर गेराल्ड कोएत्झीने हिशोब क्लिअर केला. कोएत्झीने रजतला कॅच आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आणि सेट जोडी फोडली.
रजत पाटीदार याने 11 व्या ओव्हरपर्यंत नाबाद 38 धावा केल्या होत्या. गेराल्ड कोएत्झी आरसीबीच्या डावातील 12 वी ओव्हर टाकायला आला. रजतने कोएत्झीच्या या ओव्हरमधील पहिल्या 2 बॉलवर सलग 2 सिक्स खेचून अर्धशतक ठोकलं. रजतच्या आयपीएल कारकीर्दीतील तिसरं अर्धशतक ठरलं. रजतने 25 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने 4 सिक्स आणि 3 चौकारांच्या मदतीने फिफ्टी पूर्ण केली. त्यानंतर कोएत्झीने तिसऱ्याच बॉलवर रजतला विकेटकीपर ईशान किशन याच्या हाती कॅच आऊट केलं आणि सलग ठोकलेल्या 2 सिक्सचा वचपा घेतला.
दरम्यान कोएत्झीने रजतला आऊट करत सेट जोडीही फोडली. रजत पाटीदार आणि कॅप्टन फाफ डु प्लेसिस या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. विराट कोहली 3 आणि विल जॅक्स 8 धावांवर आऊट झाल्याने आरसीबीची 2 बाद 23 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर रजत आणि फाफ या दोघांनी ही निर्णायक भागीदारी करत आरसीबीचा डाव सावरला. पण कोएत्झी याने रजतला आरसीबीचा 105 स्कोअर असताना आऊट केलं.
रजतचं 200 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक
FIFTY!
A splendid half-century by Rajat Patidar. Gets to the mark with a SIX!
Live – https://t.co/7yWt2ui23H #TATAIPL #IPL2024 #MIvRCB pic.twitter.com/TQxxoGXwFI
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2024
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी आणि आकाश मधवाल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विषक, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.