Team India : बॅटिंगसह जबरदस्त नेतृत्व, 500 पेक्षा अधिक धावा, सलग 2 आयपीएल ट्रॉफी, तरीही रजतची टीम इंडियात निवड का नाही?
Rajat Patidar : वैभव सूर्यवंशी याला भारतीय संघात आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी संधी मिळाली. मात्र बॅटिंग-नेतृत्वासह जबरदस्त कामगिरी करणारा आणि आरसीबीला सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रजत पाटीदार याची भारतीय संघात निवड करण्यात आली नाही.

बीसीसीआय निवड समितीने शनिवारी 6 जून रोजी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. तर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. निवड समितीने संघ जाहीर करण्यासह भारताच्या टी 20i संघाचा कर्णधार बदलला. सूर्यकुमार यादव याच्या जागी श्रेयस अय्यर याची कर्णधार आणि तिलक वर्मा याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली. तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी याचीही निवड केली. तर रजत पाटीदार याने त्याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएल स्पर्धेत सलग आणि एकूण दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकून दिली. त्यामुळे रजतला टीम इंडियात संधी मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र निवड समितीने आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी रजतच्या नावाचा विचारही केला नाही. त्यामुळे बॅटिंग आणि नेतृत्वासह परिपूर्ण असलेल्या रजतला संधी का दिली गेली नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. रजत पाटीदार याला उल्लेखनीय कामगिरीनंतरही...