सरफराज खान याचा धडाका सुरुच, BCCI ला शतकाद्वारे चोखं उत्तर

| Updated on: Jan 17, 2023 | 6:34 PM

सरफराज खान यांचं दिल्ली विरुद्धचं हे मोसमातील रणजी करंडकातील तिसरं शतक ठरलं आहे. याआधी सरफराजने हैदराबाद विरुद्ध 126 आणि तामिळनाडू विरुद्ध 162 धावा केल्या होत्या.

सरफराज खान याचा धडाका सुरुच, BCCI ला शतकाद्वारे चोखं उत्तर
Follow us on

मुंबई : मुंबईकर युवा फलंदाज सरफराज खान याचा शतकी धमाका सुरुच आहे. सरफराजने आता रणजी ट्रॉफी स्पर्धेत दिल्ली विरुद्ध खणखणीत शतक ठोकलंय. दिल्ली विरुद्ध मुंबई यांच्यातील सामन्याला आजपासून (17 जानेवारी) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरुवात झाली. सरफराजने आपला फॉर्म कायम राखत पुन्हा एकदा शतक ठोकलं आणि निवड समितीला जशास तसं उत्तर दिलं आहे. सरफराजच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही त्याची टीम इंडियात निवड केली जात नाहीये.

सरफराजने 135 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. दिल्ली विरुद्धचं शतक सरफराजच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारीर्दीतील 13 वं शतक ठरलं. सरफराज रणजी ट्रॉफीत सातत्याने 3 वर्षांपासून खोऱ्याने धावा करत आहे. सरफराजने 155 बॉलमध्ये 16 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 80. 65 च्या स्ट्राईक रेटने एकूण 125 धावांची खेळी केली.

सरफराजचा रणजी ट्रॉफीतील शतकी धडाका हा कायम आहे. सरफराने 2021-22 च्या रणजी स्पर्धेच्या गत मोसमात 6 सामन्यात 123 च्या दमदार सरासरीने 982 धावा केल्या होत्या. यामध्ये 4 जबरी शतकांचा समावेश होता. तसेच 2019-20 या मोसमातील 6 मॅचमध्ये 155 च्या एव्हरेजने 3 शतक आणि 2 अर्धशतकांसह 926 रन्स केल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

सरफराजचं सध्याच्या मोसमातील रणजी करंडकातील हे तिसरं शतक आहे. सरफराजने याआधी हैदराबाद विरुद्ध 126 आणि तामिळनाडू विरुद्ध 162 धावा केल्या होत्या.

निवड समितीचं मुंबईकर खेळाडूंकडे दुर्लक्ष?

सरफराजच्या निमित्ताने निवड समिती मुंबईकर खेळाडूंकडे सातत्याने दुर्लक्ष करतेय का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. याआधी सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ या दोघांनाही चांगल्या कामगिरीनंतरही संधी देण्यात आली नव्हती. यानंतर जेव्हा नेटकऱ्यांनी निवड समितीवर ताशेरे ओढले. यानंतरच निवड समितीने सुर्याचा टीम इंडियात समावेश केला.

तर पृथ्वीचा आता न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी संघात कमबॅक झालं आहे. पृथ्वी जवळपास दीड वर्षांपासून टीमपासून दूर होता. जेव्हा नेटकऱ्यांनी आणि तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर निवड समितीने पृथ्वीला संधी दिली.

दरम्यान सरफराजबद्दल ही तेच. सरफराज सातत्याने खोऱ्याने धावा करतोय. मात्र तरीही त्याची नशीबी प्रतिक्षाच. मात्र हार मानेल तो सरफराज कसला. सरफराज बोलण्याऐवजी बॅटनेच उत्तर देण्याला महत्त्वं देतोय.

टीम इंडिया आगामी काळात बऱ्याच मालिका खेळणार आहे. निवड समिती या आगामी मालिकेत सरफराजचा विचार करेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.