बॉलिंग धमाल, बॅटिंग कमाल, Ravindra Jadeja चा कारनामा, अशी कामगिरी करणारा पहिलाच क्रिकेटर

Ravindra Jadeja Record : भारताने इंग्लंड विरुद्ध 211 धावांवर पाचवी विकेट गमावली. त्यानंतर ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने कर्णधार शुबमन गिल याच्यासह सहाव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. या दरम्यान जडेजाने इतिहास घडवला आहे.

बॉलिंग धमाल, बॅटिंग कमाल, Ravindra Jadeja चा कारनामा, अशी कामगिरी करणारा पहिलाच क्रिकेटर
Ravindra Jadeja ENG vs IND
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Jul 03, 2025 | 8:38 PM

इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस भारतीय कर्णधार शुबमन गिल याच्या नावावर राहिला. शुबमनने इंग्लंड विरुद्ध शतक झळकावलं. शुबमनने या मालिकेतील सलग दुसऱ्या शतकासह इंग्लंड विरुद्ध टेस्टमध्ये सेंच्युरीची हॅटट्रिक पूर्ण केली. तर दुसऱ्या बाजूला ऑलराउंडर रवींद्र जडेजा यानेही शुबमनला चांगली साथ दिली. या जोडीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सहाव्या विकेटसाठी नाबाद 99 धावांची भागीदारी केली.

त्यानंतर या जोडीने दुसर्‍या दिवसाच्या खेळाला 5-310 धावांपासून सुरुवात केली. शुबमन-जडेजा जोडीने दुसऱ्या दिवशी सहाव्या विकेटसाठी आणखी 104 धावा जोडल्या आणि भारताला मजबूत स्थितीत आणून ठेवलं. जडेजा शतकाच्या उंबरठ्यावर पोहचला होता. मात्र इंग्लंडचे गोलंदाज यशस्वी जैस्वाल याच्यानंतर जडेजालाही शतक करण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरले. जडेजाला शतकासाठी 11 धावांची गरज होती. तेव्हा जोश टंग याने जडेजाला जेमी स्मिथ याच्या हाती कॅच आऊट केलं. अशाप्रकारे गिल-जडेजा जोडी फुटली.

गिल-जडेजा जोडीने सहाव्या विकेटसाठी 203 रन्सची पार्टनरशीप केली. जडेजाने 137 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारसह 89 धावा केल्या. जडेजा शतक करु शकला नाही. मात्र जडेजाने या खेळीसह मोठा कारनामा केला आहे. जडेजा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या (WTC History) इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

2 हजारी जडेजा

जडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात 2 हजार धावा पूर्ण केल्या. जडेजाने या स्पर्धेतील 41 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. जडेजाने या दरम्यान 3 शतकं आणि 13 अर्धशतकं लगावली आहेत.

विकेट्सचं शतक

तसेच जडेजाने यााधीच या स्पर्धेच्या इतिहासात 100 विकेट्सही पूर्ण केल्या आहेत. जडेजा अशाप्रकारे डब्ल्यूटीसी स्पर्धेत 100 विकेट्स आणि 2 हजार धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

यशस्वीचं शतक हुकलं

जडेजाप्रमाणे यशस्वी जैस्वाल याचंही शतक हुकलं. यशस्वीला शतकापासून 13 धावा दूर राहिला. यशस्वीने 107 बॉलमध्ये 13 फोरसह 87 रन्स केल्या. यशस्वीने या खेळीत 13 चौकार ठोकले.

सर जडेजाची शानदार खेळी

आता बॉलिंगकडे लक्ष

दरम्यान रवींद्र जडेजाने बॅटिंगने चोख भूमिका बजावली. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना जडेजाकडून बॉलिंगने अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे. जडेजाला पहिल्या सामन्यात बॉलिंगने काही खास करता आलं नव्हतं. त्यामुळे जडेजाचा गेल्या सामन्यातील भरपाई करण्याचा प्रयत्न असणार आहे.