
दरबारात राजा-महाराजांच्या एंट्रीबद्दल तुम्ही ऐकलं असेल, वाचल असेल. चित्रपटात हिरोची एंट्री सुद्धा एका वेगळ्या अंदाजात होते. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर महेंद्र सिंह धोनीची एंट्री ज्या पद्धतीने झाली, तसं दृश्य तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. हे सगळ रीयल होतं. या सगळ्यामध्ये लाडक्या धोनीसाठी फक्त प्रेम होतं. चेन्नईच्या मैदानात धोनीची एंट्री झाली, त्याचे निर्माता-दिग्दर्शक जनताच होती. आता प्रश्न हा आहे की, चेपॉकवर धोनीच्या एंट्री दरम्यान असं काय झालं की, आंद्रे रसेलला कान बंद करावे लागले. धोनीच्या एंट्री आधी रवींद्र जाडेजाने काय खोडसाळपणा केला होता? चेन्नईच्या फॅन्सना कशा पद्धतीने छेडण्याचा प्रयत्न केलेला? रसेलन कान बंद केल्याचा आणि जाडेजाच्या खोडसाळपणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चेपॉकवर धोनीने जी एंट्री केली, त्याचा परिणाम आंद्रे रसेलवर दिसून आला. याची सुरुवात रवींद्र जाडेजाने केली.
शिवम दुबेचा विकेट गेल्यानंतर एमएस धोनीची मैदानात एंट्री होणार होती. त्याआधी रवींद्र जाडेजाने फॅन्ससोबत एक खोडसाळपणा केला. मजा-मस्ती म्हणून त्याने हे केलं. आता एमएस धोनी फलंदाजीसाठी उतरणार असं फॅन्सना वाटत होतं. आला धोनीच. पण त्याआधी जाडेजाने थोडी मस्करी करुया असा विचार केला. त्याने असं दाखवलं की, धोनी नाही तोच फलंदाजीसाठी येतोय.
Jadeja teased the crowd by walking ahead of Dhoni as a joke. This team man🤣💛 pic.twitter.com/Kiostqzgma
— 𝐒𝐞𝐫𝐠𝐢𝐨 (@SergioCSKK) April 8, 2024
एकच उत्साह संचारला
जाडेजा पॅड बांधून बॅट हाती घेऊन मैदानाच्या दिशेने निघाला. त्यानंतर चेन्नईच्या मैदानातील आवाज काही सेकंदासाठी थांबला. जाडेजा लगेच डगआऊट एरियाकडून माघारी फिरला. धोनी फलंदाजीला उतरतोय, ते पाहिल्यानंतर मैदानात एकच उत्साह संचारला. प्रेक्षकांनी पुन्हा आरडाओरडा सुरु केला.
Russell was closing his ears due to the cheer from the crowd when Dhoni came to bat😂#MSDhoni𓃵pic.twitter.com/5k7XmKtWCZ
— Hanzala Razi 𝕏 (@ihanzalarazi) April 8, 2024
कानच जणू फाटले
धोनीच्या एंट्रीने मैदानातील जोश हाय झालाच. पण KKR चा खेळाडू आंद्रे रसेलवर त्याचा परिणाम दिसून आला. धोनीच्या नावाचा स्टेडियममध्ये एकच जयघोष सुरु होता. हा आवाज इतका होता की, आंद्रे रसेलच कानच जणू फाटले. त्याने आपल्या कानावर हात ठेवला.