RCB Champion : पहिल्यांदा जेतेपद जिंकूनही आरसीबीचं स्वप्न भंगलं! बंगळुरुच्या चाहत्यांना बसला मोठा धक्का

आयपीएल 2025 स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाव कोरलं आहे. 17 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जेतेपद मिळवलं आहे. यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. पण एका झटक्यात या आनंदावर विरजण पडलं आहे. कारण की...

RCB Champion : पहिल्यांदा जेतेपद जिंकूनही आरसीबीचं स्वप्न भंगलं! बंगळुरुच्या चाहत्यांना बसला मोठा धक्का
पहिल्यांदा जेतेपद जिंकूनही आरसीबीचं स्वप्न भंगलं!
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Jun 04, 2025 | 3:34 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत आरसीबीने रजत पाटीदारच्या नेतृत्वात जेतेपदावर नाव कोरलं आहे. गेल्या 17 वर्षात जे काही घडलं नाही ते रजत पाटीदारच्या नेतृत्वात शक्य झालं. आरसीबीने अंतिम फेरीत पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव केला आणि जेतेपदाचं स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांनी देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यात आनंदोत्सव साजरा केला. बंगळुरुत तर विजयानंतर दिवाळी साजरी केली गेली. रात्रभर फटक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावरून आरसीबीच्या चाहत्यांना जेतेपदाचा किती आनंद झाला आहे हे कळतं. आरसीबीने आयपीएल विजयानंतर फॅन्ससोबत जल्लोष करण्याचा एक प्लान आखला होता. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. चाहत्यांना आपल्या आवडत्या खेळाडूंना जवळून पाहता येणार नाही. मिडिया रिपोर्टनुसार, आरसीबीच्या विजयाचा जल्लोष बंगळुरुच्या रस्त्यावर साजरा करता येणार नाही. 4 जून 2025 रोजी होणारी ओपन टॉप बस परेड वाहतूक कोंडीच्या कारणास्तव रद्द करण्यात आली आहे.

शहरात होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी नियंत्रित करणं कठीण होऊ शकतं. यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांना 18 वर्षातील सर्वात मोठा आनंद साजरा करता येणार नाही. पण हाच जल्लोष चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आनंदोत्सव म्हणून साजरा केला जाईल. परेड रद्द झाल्याने आरसीबीने हा कार्यक्रम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात आधी संघ कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांना भेटणार आहेत. त्यांतर संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान स्टेडियमध्ये कार्यक्रम पार पडेल. या कार्यक्रमाला पास असलेल्या चाहत्यांना एन्ट्री मिळेल.

आरसीबीने 3 जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला 6 धावांनी पराभूत केलं. यापूर्वी तीनदा संघाने अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. मात्र चौथ्यांदा रजत पाटीदारच्या नेतृत्वात विजयश्री खेचून आणला. तसेच जेतेपदाचं स्वप्न 18व्या पर्वात पूर्ण केलं. खासकरून, विराट कोहली स्पर्धेतून रिटायर होण्यापूर्वी हा कप मिळावा अशी चाहत्यांची इच्छा होती. अखेर ती इच्छा पूर्ण झाली आहे.