AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : ए… अजिबात नाय, Anushka Sharma साठी चाललेली सगळी धडपड, Virat Kohli भडकला, VIDEO व्हायरल

RCB IPL 2023 : विराट कोहलीचा त्याच्यावर पारा चढला, कुठे घडलं? गर्दीला शिस्त दिसत नव्हती. त्यामुळे विराट कोहली वैतागला. विराट-अनुष्काला कारपर्यंत मार्ग काढताना चांगलेच नाकीनऊ आले. चाहत्यांचा गराडा पडला होता.

IPL 2023 : ए... अजिबात नाय, Anushka Sharma साठी चाललेली सगळी धडपड, Virat Kohli भडकला, VIDEO व्हायरल
Virat kohli Anushka SharmaImage Credit source: PTI/instagram
| Updated on: Apr 25, 2023 | 3:43 PM
Share

RCB IPL 2023 : IPL 2023 च्या निमित्ताने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या सर्वत्र एकत्र दिसतायत. दोघांच्या डान्स, मजा, मस्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयपीएल मॅचच्यावेळी अनुष्का प्रेक्षक स्टँडमधून विराटला चिअर करताना दिसते. मॅच नंतर हे कपल एकत्र फिरताना दिसतय. विराट आणि अनुष्का दोघेही सेलिब्रिटी असल्याने त्यांची फॅन फॉलोइंग मोठी आहे. त्यामुळे हे कपल सार्वजनिक ठिकाणी दिसताच, त्यांना पाहण्यासाठी एकच झुंबड उडते.

या जोडीसोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांमध्ये चढा-ओढ लागलेली असते. बंगळुरुत गर्दीमध्ये दोघे सापडल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात विराट कोहली भडकल्याच दिसतय.

बातमी आगीसारखी पसरली

आरसीबीच्या सामन्यांच्या निमित्ताने विराट कोहली बंगळुरुमध्ये आहे. तो आणि अनुष्का दोघे बंगळुरुतल्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गेले होते. बंगळुरुतल्या प्रसिद्ध CTR उपहारगृहात दोघांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांवर ताव मारला. यावेळी दोघे CTR मध्ये असल्याची बातमी आगीसारखी पसरली. मग काय? दोघांना पाहण्यासाठी हॉटेलबाहेर चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती.

विराट कोहली इतका का वैतागला?

हॉटेलमधूनम बाहेर पडताना विराट, अनुष्काची चांगलीच तारांबळ उडाली. कारपर्यंत पोहोचताना त्यांना नाकीनऊ आले. दोघांना चाहत्यांनी घेरले होते. चाहते फोटोसाठी विनंती करत होते. उपहरागृहाबाहेरचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात विराट चाहत्यावर वैतागल्याच दिसतय. सुरक्षाकड भेदून हा चाहता अनुष्कासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडत होता. म्हणून विराट कोहली त्याच्यावर वैतागला. गर्दीला कुठलीही शिस्त नव्हती. त्यामुळे विराटचा पारा चांगलाच चढला. तो चाहत्याला अनुष्कापासून लांब व्हायला सांगत होता.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल