IPL 2022: लखनौ विरुद्ध Playoff मध्ये खेळण्यासाठी RCB चा प्रमुख गोलंदाज फिट होईल?

IPL 2022: लखनौ विरुद्ध Playoff मध्ये खेळण्यासाठी RCB चा प्रमुख गोलंदाज फिट होईल?
RCB
Image Credit source: IPL

IPL 2022: आरसीबीचा संघ त्या दिवशी मुंबईच्या टीमला सपोर्ट् करत होता. प्लेऑफमध्ये फाफ डू प्लेसिसच्या आरसीबीचा आता केएल राहुलच्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सामना होणार आहे.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 23, 2022 | 8:46 AM

मुंबई: Mumbai Indians ने Delhi Capitals वर विजय मिळवल्यामुळे Royal challengers banglore ची टीम प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. शनिवारी मुंबई आणि दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यावर आरसीबीची नजर होती. आरसीबीचा संघ त्या दिवशी मुंबईच्या टीमला सपोर्ट् करत होता. प्लेऑफमध्ये फाफ डू प्लेसिसच्या आरसीबीचा आता केएल राहुलच्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सामना होणार आहे. बुधवारी 25 मे रोजी एलिमिनेटरची पहिली मॅच होईल. कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर हा सामना होणार आहे. नॉकआऊट स्टेजचा हा सामना आहे. म्हणजे पराभूत होणाऱ्या टीमला दुसरी संधी मिळणार नाही. या सामन्याआधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा प्रमुख गोलंदाज हर्षल पटेलच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह आहे. हर्षल पटेलला गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात खेळताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो फक्त एक षटक टाकू शकला. एलिमिनेटरच्या महत्त्वाच्या सामन्याआधी मी फिट होईल, अशी हर्षल पटेलने खात्री दिली आहे.

मी फिट असेन

“मला वेबिंगची दुखापत झाली असून उजव्या हाताला एक-दोन टाके पडले आहेत. तीन-चार दिवसात हे टाके निघतील. एलिमिनेटरच्या सामन्यात खेळण्यासाठी मी फिट असेन” असं हर्षल पटेल आरसीबीच्या वेबसाइटसशी बोलताना म्हणाला.

शॉर्ट कव्हरला झेल घेताना दुखापत

लीगमधील RCB च्या शेवटच्या सामन्यात हर्षल पटेलला ही दुखापत झाली. एकस्ट्रा शॉर्ट कव्हरला झेल घेतलाना ही दुखापत झाली. हर्षल पटेलने त्यानंतर लगेच मैदान सोडलं व आरसीबीच्या फिजियोला दुखापत दाखवली. हर्षलच्या दुखापत झालेल्या भागाला टाके घालण्यात आले. त्या सामन्यात तो मैदानात परतला नाही. बँगलोरने त्या सामन्यात गुजरात टायटन्सवर आठ विकेट राखून विजय मिळवला. विराट कोहलीने 54 चेंडूत 73 आणि फाफ डू प्लेसिसने 38 चेंडूत 44 धावा केल्या.

हे सुद्धा वाचा

या सीजनमध्ये हर्षल पटेलने किती विकेट काढल्या?

31 वर्षाचा मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेल आरसीबीचा मुख्य आधारस्तंभ आहे. मागच्या सीजनमध्ये त्याने पर्पल कॅप मिळवली होती. 2021 च्या सीजनमध्ये त्याने 15 सामन्यात 32 विकेट काढल्या होत्या. या सीजनमध्ये 13 सामन्यात त्याने 18 विकेटस काढल्या आहेत. डेथ ओव्हर्समध्ये पटेल चांगली गोलंदाजी करतो. वेगवान गोलंदाजी करतानाच स्लोअर वन चेंडूचाही तो खुबीने वापर करतो. ते त्याच्या भात्यातील मुख्य अस्त्र आहे. आयपीएलमध्ये 100 विकेट मिळवण्यापासून हर्षल पटेल फक्त चार विकेट लांब आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें