“मिठाई-फटाके आणले होते…”, वर्ल्ड कप संघातून डच्चू मिळाल्यानंतर रिंकूच्या वडिलांचा व्हीडिओ व्हायरल

Rinku Singh Father Khanchandra Singh reaction : आपल्या मुलाने वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करावं, असं प्रत्येक खेळाडूच्या आई-वडिलांचं स्वप्न असतं. तसं ते खानचंद्र सिंह यांचही होतं. पण ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.

मिठाई-फटाके आणले होते..., वर्ल्ड कप संघातून डच्चू मिळाल्यानंतर रिंकूच्या वडिलांचा व्हीडिओ व्हायरल
Rinku Singh Family,
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: May 01, 2024 | 6:13 PM

आगामी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी 30 एप्रिल रोजी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृ्त्व करणार आहे. तर हार्दिक पंड्या याला उपकर्णधार करण्यात आलंय. बीसीसीआयने ऑलराउंडर शिवम दुबेला संधी दिली. तर काही खेळाडूंना मुख्य संघात स्थान न दिल्याने सोशल मीडियावर एक चर्चा सुरु झाली आहे. टीम इंडियाचा स्टार फिनिशीर रिंकू सिंह हा वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार होतो. मात्र त्याला मुख्य संघाऐवजी राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्या आलं. निवड समितीचा निर्णय हा अनेकांना पटलेला नाही. रिंकूला वगळल्यानंतर त्याचे वडील खानचंद्र सिंह यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रिंकूचे वडील खानचंद्र यांना आपल्या पोराला वर्ल्ड कप संघात स्थान मिळेल, याची खात्री होती. त्यामुळे आपल्या मुलाला संघात स्थान मिळाल्याचा जल्लोष करण्यासाठी त्यांनी मिठाईसह फटाके आणले होते. मात्र रिंकू निवड झाली नाही.त्यामुळे खेमचंद्रही दुखावलते. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत काय म्हटलं? रिंकूसोबत बोलणं झालं तेव्हा त्याने काय सांगितलं? हे जाणून घेऊयात.

खानचंद्र सिंह काय म्हणाले?

“खूप आशा होत्या. आम्ही मिठाई-फटाके आणले होते. विचार केला होता की तो टी 20 वर्ल्ड कपमध्ये प्लेईंग ईलेव्हनमध्ये खेळेल. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे थोडं दु:ख आहे. रिंकूलाही वाईट वाटलंय. रिंकू त्याच्या आईसोबत बोलला आणि सांगितलं की त्याचं नाव नाहीय”, असं खानचंद्र सिंह यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

रिंकू सिंहच्या वडिलांची प्रतिक्रिया

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान