AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला असं अजिबात आवडत नाही’, ऋषभ पंतच्या रागीट पोस्टने चाहत्यांचं मन दुखावलं

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील चार सामन्यात ऋषभ पंतने जबरदस्त कामगिरी केली. मात्र चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात दुखापतग्रस्त झाला आणि थेट स्पर्धेतून आऊट झाला. आता सहा आठवडे बरं होण्यास जाणार आहेत. अशा स्थितीत त्याची एक रागीट पोस्ट चर्चेत आहे.

'मला असं अजिबात आवडत नाही', ऋषभ पंतच्या रागीट पोस्टने चाहत्यांचं मन दुखावलं
'मला असं अजिबात आवडत नाही', ऋषभ पंतच्या रागीट पोस्टने चाहत्यांचं मन दुखावलंImage Credit source: Rishabh Pant Facebook
| Updated on: Aug 14, 2025 | 4:57 PM
Share

ऋषभ पंत हे भारतीय क्रिकेटमधील एक मोठं नाव… त्याचं संघात असणं म्हणजे सामन्याचं चित्र कधीही पालटू शकतो. आतापर्यंत अनेक सामन्यात असं पाहायला मिळालं आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात तर त्याने दोन्ही डावात शतकी खेळी केली होती. त्यानंतरही त्याचा फॉर्म कायम होता. पण चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याच्या बोटाला चेंडू लागला आणि फ्रॅक्चर झालं. त्यामुळे त्याला बेंचवर बसण्याची वेळ आहे. अशा स्थितीतही त्याने पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात फलंदाजीची वेळ आली नाही. पाचव्या कसोटीत दुखापतीमुळे आऊट झाला. आता त्याला सहा आठवड्यांचा आराम करावा लागणार आहे. त्यामुळे आशिया कप 2025 स्पर्धेला मुकावं लागणार आहे. अशा स्थितीत ऋषभ पंतची सोशल मिडिया पोस्ट चर्चेत आहे. त्याने आपल्या दुखापतीची अपडेट दिली आहे.

ऋषभ पंतने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यात त्याने त्याचा फ्रॅक्चर झालेल्या पायाचा फोटो टाकला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘मला हे अजिबात आवडत नाही.’ ऋषभ पंतच्या पोस्टमधूनच स्पष्ट कळतं की तो या दुखापतीमुळे वैतागला आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर व्यक्त झाला आहे. आता ऋषभ पंत मैदानात कधी उतरेल याची उत्सुकता आहे. खऱं तर त्याला सहा आठवडे आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. पण इंग्लंड दौऱ्यानंतर तीन आठवड्याचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे तीन आठवड्यांचा अवधी शिल्लक आहे. जर या काळात बरा झाला नाही तर आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते.

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत उपकर्णधारपदाची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर होती. त्याने चार सामन्यात 68.42 च्या सरासरीने 479 धावा केल्या. यात त्याने 2 शतकं आणि 3 अर्धशतकं ठोकली. या मालिकेत त्याची सर्वोच्च धावसंख्या ही 134 होती. ऋषभ पंतचा फॉर्म पाहता त्याने या मालिकेत आरामात 500 धावांचा टप्पा ओलांडला असता. पण दुखापत झाली आणि त्याचं पुढचं खेळणं झालंच नाही. तसं पाहीलं तर वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणं देखील कठीण आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था