AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant Health: मुंबईत डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ऋषभ पंत संदर्भात एक बॅड न्यूज

Rishabh Pant Health: मुंबईतल्या कोकीळाबेन हॉस्पिटलमध्ये ऋषभला शिफ्ट करण्यात आलय. तिथल्या डॉक्टरांनी तपासल्यानंतरे पहिलं 'हे' निरीक्षण नोंदवलय

Rishabh Pant Health: मुंबईत डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ऋषभ पंत संदर्भात एक बॅड न्यूज
rishabh pantImage Credit source: twitter
| Updated on: Jan 06, 2023 | 10:41 AM
Share

Rishabh Pant Health Update: टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला मुंबईच्या कोकीलाबेन रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलय. मागच्यावर्षी 30 डिसेंबरला दिल्ली-डेहराडून हायवे वर ऋषभच्या कारला भीषण अपघात झाला होता. सुदैवाने ऋषभ या अपघातातून बचावला. पण त्याला गंभीर मार लागलाय. आधी त्याच्यावर डेहराडून येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी अधिक चांगल्या उपचारांसाठी ऋषभला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

डॉक्टरांच पहिलं निरीक्षण काय?

आता कोकिलाबेन हॉस्पिटलमधून ऋषभच्या प्रकृतीबद्दल माहिती समोर आली आहे. निश्चितच डॉक्टरांनी नोंदवलेल निरीक्षण क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणार आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ऋषभला मैदानावर कमबॅक करण्यासाठी 8 ते 9 महिने लागू शकतात. याचा अर्थ ऋषभ फक्त IPL 2023 नाही, तर आगामी वनडे वर्ल्ड कप 2023 ला मुकणार आहे. ऑक्टोबरमध्ये वनडे वर्ल्ड कप होणार आहे.

डॉक्टरांच म्हणण काय?

डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी गुरुवारी सकाळी पंतची तपासणी केली. डॉ. दिनशॉ हे, कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक्सचे डायरेक्टर आहेत. ऋषभची सूज जो पर्यंत उतरणार नाही, तो पर्यंत एमआरआय किंवा सर्जरी करता येणार नाही, असं त्यांचं मत आहे. ऋषभच्या लिगामेंटला दुखापत झालीय. त्यामुळे त्याला मैदानावर कमबॅक करण्यासाठी त्याला 8 ते 9 महिने लागू शकतात, असं रुग्णालयातील स्पेशलिस्ट डॉक्टरांच म्हणणं आहे. इनसाइड स्पोर्ट्ने बीसीसआय मेडीकल टीमच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलय.

पुढच्या 3-4 दिवसात चित्र स्पष्ट होईल

“लिगामेंटला कितपत दुखापत झालीय, ते यावेळी सांगू शकत नाही. पुढच्या 3-4 दिवसात चित्र स्पष्ट होईल. पंतच्या लिगामेंटला गंभीर दुखापत झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. ऋषभला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी 6 ते 9 महिने लागू शकतात” बीसीसीआय मेडीकल टीमच्या जवळच्या सूत्रांनी ही माहिती दिली. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी कुठलीही कमेंट केलेली नाही. “आम्ही आमच्यापद्धतीने सर्वोत्तम काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी इंजरीबद्दल कुठलीही कमेंट करणं, ते अंदाज वर्तवण ठरेल. डॉक्टरांना त्यांच्या प्रोसिजरनुसार निरीक्षण करुं दे” असं आयपीएल चेअरमन अरुण धुमळ म्हणाले.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.