Rishabh Pant दिल्ली कॅपिटल्स संघात येताच कर्णधार अक्षर पटेलने एका वाक्यात विषय संपवला, म्हणाला…

आयपीएल 2027 स्पर्धेला अजून बराच अवकाश आहे. पण त्या आधीच दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सने ट्रेड करत ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांची अदलाबदल केली. त्यामुळे पुढच्या पर्वात ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. असं असताना अक्षर पटेलच्या विधानाची चर्चा आहे.

Rishabh Pant दिल्ली कॅपिटल्स संघात येताच कर्णधार अक्षर पटेलने एका वाक्यात विषय संपवला, म्हणाला...
Rishabh Pant दिल्ली कॅपिटल्स संघात येताच कर्णधार अक्षर पटेलने एका वाक्यात विषय संपवला, म्हणाला...
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Jun 24, 2026 | 5:23 PM

आयपीएल 2027 स्पर्धेला अजून दहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. पण लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील ट्रेड मात्र चर्चेत आहे. लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतऐवजी कुलदीप यादवसाठी ट्रेड केली. त्यामुळे पुढच्या पर्वात ऋषभ पंत पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. एका अर्थाने ऋषभ पंतची घरवापसी झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात त्याने सर्वाधिक सामने दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळले आहेत. असं असताना दिल्ली कॅपिटल्स संघात आल्याने फ्रेंचायझीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ऋषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्सपर्यंतचा प्रवास दिसत आहे. तसेच या व्हिडीओच्या शेवटी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे.

दिल्ली कॅपिटल्सने शेअर केलेल्या व्हिडीओची सुरूवात ऋषभ पंतच्या शब्दांनी होते. व्हिडीओच्या सुरूवातीलाच ऋषभ पंत, दिल्लीकर कसे आहात? असं विचारतो. त्यानंतर त्याच्या लहानपणीचे फोटो एका पाठोपाठ एक फ्लॅश होत जातात. दिल्ली कॅपिटल्सने हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं की, ऋषभ म्हणजे दिल्ली, दिल्ली म्हणजे ऋषभ… या व्हिडीओच्या शेवटी अक्षर पटेल एका सोफ्यावर बसलेला आहे. त्याला कॅप्टन ग्रेट न्यूज असं विचारलं जातं. तेव्हा अक्षर पटेल सांगतो की, हा.. टायगर परत आपल्या परिक्षेत्रात आला.

दिल्ली कॅपिटल्सने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात अक्षर पटेल म्हणतो की, प्रेम इतकं आहे की, प्रेम इतके घट्ट आहे की ते ऋषभला दिल्लीत घेऊन आले. व्हिडिओमध्ये अक्षरने त्याच्या आणि ऋषभच्या संभाषणाबद्दल सांगितले आहे.

ऋषभने त्याला दोनदा फोन केला, पण त्याने उचलला नाही. मग त्याने रात्री फोन केला, तेव्हा पंतने त्याला सांगितले की सर्व काही निश्चित झाले आहे आणि दिल्लीत परत येत आहे.

Follow Us