AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुबमन गिलच्या 238 धावा रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर पडल्या भारी! आयसीसीच्या घोषणेमुळे झालं स्पष्ट

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात नुकतीत वनडे मालिका पार पडली. ही मालिका भारताने 3-0 ने जिंकली. तसेच या मालिकेत शुबमन गिलची कामगिरीही जबरदस्त राहिली. त्याचं फळ आयसीसीने त्याला दिलं आहे.

शुबमन गिलच्या 238 धावा रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर पडल्या भारी! आयसीसीच्या घोषणेमुळे झालं स्पष्ट
शुबमन गिलच्या 238 धावा रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर पडल्या भारी! आयसीसीच्या घोषणेमुळे झालं स्पष्टImage Credit source: BCCI
| Updated on: Jun 24, 2026 | 4:56 PM
Share

भारताने अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका 3-0 ने खिशात घातली. या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थाने ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल याने मोठी झेप मारली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील चांगल्या कामगिरीमुळे त्याला फायदा झाला आहे. त्याने या क्रमवारीत मोठी उडी घेत दुसरं स्थान गाठलं आहे. यासह त्याने भारतीय संघातील दोन दिग्गज फलंदाज असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मागे टाकलं आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत शुबमन गिलने धावांचं योगदान दिलं. त्याने दोन डावात फलंदाजी करताना 238 च्या सरासरीने आणि 135.22 च्या स्ट्राईक रेटने 238 धावा केल्या. या खेळीत फळ म्हणून त्याची वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानी वर्णी लागली आहे.

शुबमन गिलची वनडे कामगिरी

शुबमन गिलने धर्मशाळेत खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात नाबाद 84 धावांची विजयी खेळी केली होती. त्यानंतर त्याने लखनौ वनडे मालिकेत 154 धावा करत शतक ठोकलं होतं. त्यानंतर तिसऱ्या वनडे सामन्यात त्याच्या वाटेला फलंदाजी आली नाही. पण पहिल्या दोन सामन्यात केलेल्या कामगिरीचा त्याला फायदा झाला. त्यामुळे वनडे रँकिंगमध्ये त्याला वरचं स्थान मिळालं आहे. या मालिकेपूर्वी शुबमन गिल पाचव्या स्थानावर होता. पण आता त्याला तीन क्रमांकांचा फायदा होत दुसरं स्थान गाठलं आहे. 238 धावा केल्याने त्याची 791 इतकी रेटिंग झाली आहे. त्याच्या या खेळीमुळे विराट कोहली आणि रोहित शर्माला फटका बसला. विराट कोहली तिसऱ्या स्थानावर, तर रोहित शर्मा चौथ्या स्थानावर घसरला आहे.

या खेळाडूंना मिळाला लाभ

अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेनतंर काही खेळाडूंना लाभ मिळाला आहे. श्रेयस अय्यरच्या वनडे क्रमवारीत कमालीची सुधारणा झाली आहे. 638 रेटिंगसह आता 14व्या स्थानावर आहे. तर इशान किशनने 21 क्रमांकाची झेप घेत 43वा क्रमांक गाठला आहे. तर यशस्वी जयस्वालही 84 फलंदाजांना मागे टाकत 71व्ाय क्रमांकावर बसला आहे. यशस्वी जयस्वालने शेवटच्या वनडे सामन्यात शतक ठोकलं होतं.

Follow Us
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट