AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhantrayodashi 2026: धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करताय? दुकानात जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की तपासा

धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेर देवांची पूजा केली जाते. यासोबतच अनेक लोक सोने आणि चांदीच्या वस्तूही खरेदी करतात. मात्र, खरेदी करण्यापूर्वी योग्य किंमत कशी ठरवावी आणि शुद्धता कशी ओळखावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Dhantrayodashi 2026: धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करताय? दुकानात जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की तपासा
gold rate today Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Nov 06, 2026 | 7:16 PM
Share

आज देशभरात धनत्रयोदशीच्या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. विशेषतः बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी असते. सकाळपासूनच बाजारपेठा सजवल्या जातात आणि रात्रीपर्यंत जोरदार खरेदी सुरू असते. लोक सोने-चांदीचे दागिने आणि नाणीही खरेदी करतात. संध्याकाळच्या पूजेमध्येही या वस्तू ठेवल्या जातात. तुम्हीही सोने किंवा चांदीची एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी जात असाल, तर त्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या खिशाला जास्त फटका बसणार नाही.

सोने आणि चांदी खरेदी करताना त्याच्या शुद्धतेपासून ते किमतीपर्यंत अनेक गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. अनेकदा योग्य माहिती नसल्यामुळे तुम्हाला वस्तूची जास्त किंमत मोजावी लागते किंवा तिची शुद्धता योग्य नसते. चला तर मग, सोने-चांदी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे जाणून घेऊया.

किती कॅरेटचे सोने आहे?

तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करत असाल, तर ते बहुतांश वेळा २२ किंवा १८ कॅरेटचे असतात. तर सोन्याचे नाणे खरेदी करत असाल, तर ते २४ कॅरेटचेही असू शकते. त्यामुळे सोन्याची किंमत ठरवताना त्याच्या कॅरेटनुसारच किंमत मोजणे महत्त्वाचे आहे. सोन्यावर ९९९ असे लिहिले असेल, तर ते २४ कॅरेट सोने असते. ९१६ लिहिले असेल, तर ते २२ कॅरेट, ८७५ म्हणजे २१ कॅरेट, ७५० म्हणजे १८ कॅरेट आणि ५८३ किंवा ५८५ क्रमांक असेल, तर ते १४ कॅरेट सोने असते.

चांदीची शुद्धता

तुम्ही चांदी खरेदी करत असाल, तर त्यावर कोणता कोड आहे, हे तपासणे आवश्यक आहे. सर्वाधिक शुद्ध चांदीचा क्रमांक ९९९ असतो. स्टर्लिंग सिल्व्हरचा क्रमांक ९२५, ब्रिटानिया सिल्व्हरचा ९५८, कॉइन सिल्व्हरचा ९००, तर ८० टक्के चांदीचा क्रमांक ८०० असतो. याच क्रमांकांनुसार तुम्ही तुमच्या दागिन्यांची किंवा नाण्यांची किंमत ठरवावी.

सोने-चांदीची शुद्धता

सोन्याची योग्य शुद्धता ओळखण्यासाठी त्यावर असलेले BIS म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सचे हॉलमार्क तपासावे. हे त्रिकोणी आकाराचे असते. यासोबतच HUID म्हणजेच हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन कोड असतो. हा कोड मशीनच्या साहाय्याने दागिन्यांवर कोरला जातो. तुम्ही अधिकृत ॲप किंवा वेबसाइटवर हा कोड टाकून त्याची माहिती तपासू शकता. चांदीची शुद्धता तपासण्यासाठीही BIS हॉलमार्क असतो. याशिवाय, शक्यतो विश्वासार्ह ज्वेलर्सकडूनच सोने-चांदी खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

मेकिंग चार्जची माहिती नक्की घ्या

तुम्ही सोने किंवा चांदीचे जे काही दागिने खरेदी करत आहात, त्यांचे मेकिंग चार्ज म्हणजेच घडणावळ शुल्क किती आहे, हे नक्की जाणून घ्या. योग्य किंमत किती आहे, हे समजण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या दुकानांमध्ये मेकिंग चार्जची माहिती घेऊ शकता. त्यानुसारच दागिन्यांची किंमत मोजावी.

पक्के बिल घेणे सर्वात महत्त्वाचे

तुम्ही दागिने खरेदी करायला जात असाल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्के बिल घेणे. अनेकदा ज्वेलर्स थोडे पैसे कमी करण्याचे सांगून कच्चे बिल देतात. मात्र, अशा आमिषाला बळी पडू नये. नेहमी पक्के बिलच घ्यावे. या बिलामध्ये सर्व गोष्टींची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, दागिने किती कॅरेटचे आहेत, चांदीचा प्रकार कोणता आहे, त्याचे मेकिंग चार्ज किती आहे आणि GST किती आकारला आहे, या सर्व गोष्टी बिलामध्ये नमूद असाव्यात.

Follow Us
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव