Team India : ऋषभ पंत याची जागा भरून काढणारा खेळाडू मिळाला, दिग्गजाचं मोठं वक्तव्य!

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची अवस्था खराब झालेली आहे. अशातच पंतची जागा भरून काढणारा खेळाडू टीम इंडियाला मिळाला आहे.

Team India : ऋषभ पंत याची जागा भरून काढणारा खेळाडू मिळाला, दिग्गजाचं मोठं वक्तव्य!
Rishabh PantImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 8:31 PM

मुंबई : भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत डिसेंबर महिन्यात झालेल्या अपघातामुळे तेव्हापासून मैदानापासून लांब आहे. ऋषभला या अपघातामुळे आयपीएलमध्येही खेळता आलेलं नाही. इतकंच नाहीतर त्याला टीम इंडियामध्ये खेळता येणार नाही. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची अवस्था खराब झालेली आहे. अशातच पंतची जागा भरून काढणारा खेळाडू टीम इंडियाला मिळाला असल्याचं एका दिग्गज खेळाडूने सांगितलं आहे.

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन याने ऋषभ पंतच्या जागी एका युवा खेळाडूची निवड केली आहे. पीटरसनने संजू सॅमसन, के.एल. राहुल किंवा ईशान किशनला नाही, तर या खेळाडूला पंतचा सर्वोत्तम बदली खेळाडू म्हणून जितेश शर्माचं नाव घेतलं आहे.

यंदाच्या मोसमात जितेश शर्मा मोसमात पंजाब किंग्जकडून खेळत आहे. पंजाबचा तो यष्टीरक्षक फलंदाज आहे. पीटरसनला असं वाटतं की ऋषभ पंतची जागा जितेश शर्मा हा खेळाडू भरून काढू शकतो.

आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या जितेश शर्माने मुंबई इंडियन्सविरुद्ध मॅच-विनिंग खेळी केली होती. जितेशने 7 चेंडूत 25 धावा केल्या. या खेळीत 4 षटकारांचा समावेश होता. इतकंच नाही तर आयपीएलच्या शेवटच्या सीझनमध्येही जितेशने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. जितेशने आयपीएल 2022 मध्ये 12 सामने खेळले आणि 163.64 च्या स्ट्राइक रेटने 234 धावा केल्या होत्या.

काही दिवसांवर आता वर्ल्ड  कप आला आहे. वर्ल्ड कप संघातही पंतची जागा फिक्स मानली  जात होती. मात्र त्याच्या अनुपस्थितीमध्ये आता कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पीटरसनच्या म्हणण्यानुसार जितेश शर्मा याला द्यायला हवी मात्र युवा खेळाडूला संधी मिळणं अशक्य वाटत आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.