Video : ऋषभ पंतची झुंजार खेळी, मोडलेला पाय आणि इंग्लंडच्या गोलंदाजाला षटकार

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात जखमी असलेल्या ऋषभ पंतने झुंजार खेळी केली. 37 धावांवर असताना रिटायर्ड हर्ट झाला होता. पण त्याने असं असूनही मैदानात उतरला आणि अर्धशतक पूर्ण केलं. यामुळे टीम इंडियाच्या धावसंख्येत भर पडली.

Video : ऋषभ पंतची झुंजार खेळी, मोडलेला पाय आणि इंग्लंडच्या गोलंदाजाला षटकार
ऋषभ पंतची झुंजार खेळी, मोडलेल्या पाय आणि इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 24, 2025 | 7:40 PM

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताची करो या मरोची स्थिती आहे. हा सामना भारताला एक तर जिंकावा किंवा ड्रॉ तरी करावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. भारताने पहिल्या डावात 114.1 षटकांचा सामना केला आणि 358 धावांवर सर्वबाद झाले. या सामन्यात साई सुदर्शनने 61, यशस्वी जयस्वालने 58, ऋषभ पंतने 54 आणि केएल राहुलने 46 धावांची खेळी केली. दरम्यान ऋषभ पंतला दुखापत झाली आणि टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. कारण ऋषभ पंत फलंदाजीला उतरला नाही तर दहा फलंदाजासह खेळावं लागणार होतं. पण ऋषभ पंतने आपली दुखापत बाजूला ठेवून मैदानात उतरला. पहिल्या दिवशी रिटायर्ड हर्ट झाला तेव्हा त्याने 37 धावा केल्या होत्या. यात खेळीत त्याने आणखी 17 धावांची भर घातली. त्याने 75 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार मारत 54 धावा केल्या. ऋषभ पंतने 69 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.ऋषभ पंतने यासह कसोटीत 18वं अर्धशतक पूर्ण केलं.

डावखुऱ्या ऋषभ पंतने SENA देशांविरुद्ध कसोटीत 50 हून अधिक धावा करणारा भारतीय विकेटकीपर ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. इंग्लंडविरुद्धच्या 54 धावा करत 14व्यांदा सेना देशांविरुद्ध अर्धशतक ठोकलं आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नावावर 13 अर्धशतकं आहेत. यात जॉन वेट तिसऱ्या स्थानी असून त्याने 12 वेळा हा कारनामा केला आहे. एडम गिलख्रिस्टने 11 वेळा, तर दिनेश रमणदीनने 10 वेळा अशई कामगिरी केली आहे.

दुसरीकडे, ऋषभ पंतला पायाला दुखापत झालेली पाहून इंग्रज त्याच्या पायावर चेंडू टाकत होते. मात्र असं असूनही ऋषभ पंत चांगल्या प्रकारे त्यांचा सामना करत होता. 110 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जोफ्रा आर्चरने त्याला यॉर्कर चेंडू टाकत फसवण्याचा प्रयत्न केला. पण कसा बसा त्यातून बचावला. त्यानंतर 110 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. ऋषभ पंतने कसोटी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या विरेंद्र सेहवागची बरोबरी केली आहे. त्याने आतापर्यंत कसोटीत 90 षटकार मारले आहेत.