IPL 2027: ऋषभ पंतने आयपीएल संघ बदलताच मोठा फटका, आता 27 कोटी नाही तर इतके पैसे मिळणार

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्ससोबत मोठी ट्रेड केली आहे. या ट्रेडच्या माध्यमातून ऋषभ पंतला रिलीज केलं आहे. त्यामुळे ऋषभ पंतच्या कोट्यवधीच्या मानधनावर थेट परिणाम झाला आहे.

IPL 2027: ऋषभ पंतने आयपीएल संघ बदलताच मोठा फटका, आता 27 कोटी नाही तर इतके पैसे मिळणार
IPL 2027: ऋषभ पंतने आयपीएल संघ बदलताच मोठा फटका, आता 27 कोटी नाही तर इतके पैसे मिळणार
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Jun 23, 2026 | 4:25 PM

आयपीएल 2027 स्पर्धेत स्टार विकेटकीपर फलंदाज लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार नाही हे निश्चित झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सने ट्रेड विंडोच्या माध्यमातून ऋषभ पंतला संघात घेतलं आहे. त्याच्या जागी दिल्ली कॅपिटल्सने कुलदीप यादवला रिलीज केलं आहे. आता कुलदीप यादव लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग असणार आहे. या ट्रेडमधून ऋषभ पंतचं मोठं नुकसान झालं आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून दोन वर्षांपूर्वी मान मिळाला होता. आयपीएल 2025 मेगा लिलावात त्याच्यासाठी लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपये मोजले होते. त्यामुळे दोन पर्व त्याने 27 कोटींचं मानधन घेतलं. मात्र आता ट्रेड झाल्याने त्या मानधनाला कात्री लागली आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 15 कोटींच्या ट्रेड डीलवर संघात घेतलं आहे. त्यामुळे ऋषभ पंतचं 12 कोटींचं नुकसान झालं आहे.

ऋषभ पंतचं दिल्ली संघात पुनरागमन

दोन वर्षांपूर्वी ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सला सोडचिठ्ठी देत लिलावात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने आरटीएम कार्डही वापरलं होतं. पण लखनौ सुपर जायंट्सने बाजी मारली आणि त्याला संघात घेतलं. ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्ससाठी 2016 ते 2024 दरम्यात नऊ पर्वात 111 सामने खेळला आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू म्हणून मान मिळवला. त्यात 43 सामन्यात त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा सांभाळली होती. ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्साठी दोन पर्वात एकूण 28 सामने खेळला. त्यात 1 शतक आणि एक अर्धशतक ठोकत 581 धावा केल्या.

कुलदीप यादवचा ना तोटा ना नफा

कुलदीप यादव आयपीएल 2027 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्ससाठी खेळणार आहे. या फ्रेचायझीतही त्याला दिल्ली देत असलेली रक्कम मिळणार आहे. त्यामुळे त्याचं ऋषभ पंतसारखं काही नुकसान झालेलं नाही. कुलदीप यादवला लखनौ सुपर जायंट्स 13.5 कोटी देणार आहे. कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्ससाठी पाच पर्वात खेळला होता. या पाच पर्वात त्याने 65 सामने खेळले आणि 72 विकेट काढल्या. कुलदीप यादव केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळला आहे. पहिल्यांदाच लखनौ सुपर जायंट्स संघासोबत खेळताना दिसणार आहे.

Follow Us