WI vs IND 1 TEST | Rohit Sharma ने भर सामन्यात दिली शिवी? अखेर समोर आला Video

रोहित शर्माने शतकी खेळी केली मात्र त्याआधी त्याने दिलेली शिवी त्याच्या शतकापेक्षा जास्त ट्रेंडमध्ये आहे. रोहित शर्माने शिवी दिल्याचं क्लिअर ऐकू येत आहे.

WI vs IND 1 TEST | Rohit Sharma ने भर सामन्यात दिली शिवी? अखेर समोर आला Video
| Updated on: Jul 14, 2023 | 3:28 PM

मुंबई : वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामधील पहिल्या कसोटी सामन्यामधील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने शिवी दिल्याचं क्लिअर ऐकू येत आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. रोहित शर्माने शतकी खेळी केली मात्र त्याआधी त्याने दिलेली शिवी आता त्याच्या शतकापेक्षा जास्त ट्रेंडमध्ये आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

वेस्ट इंडिजने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. अश्विनने 5 विकेट्स घेत अर्धा कॅरबियन संघ माघारी पाठवला. त्यासोबतच इतर गोलंदाजांचा त्याला योग्य साथ मिळाली. यामुळे अवघ्या150 धावांवर त्यांचा डाव गुंडाळला. त्यानंतर टीम इंडियाची दमदार सुरूवात झाली. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी 229 धावांची सलामी दिली. दोघांनी जबरदस्त शतके केलीत.

पाहा व्हिडीओ-

 

आठव्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा स्ट्राईकला खेळत असताना संघाच्या 32 धावा झाल्या होता. वेस्ट इंडिजचा अल्झारी जोसेफ गोलंदाजी करत होता. अल्झारीचा बॉल रोहितच्या पायावर बसला आणि मागच्या दिशेने गेला. त्यावेळी रोहित XXXX दिलेली ही शिवी स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाली.

दरम्यान, भारत आता मजबूत स्थितीत असून दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर भारताच्या 312-2 धावा झाल्या आहेत. 162 धावांची आघाडीही भारताकडे आहे आणि मैदानात विराट कोहली नाबाद 36 धावा आणि यशस्वी जयस्वाल नाबाद 143 धावांवर खेळत आहेत.

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.