Rohit Sharma | मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर रोहित शर्मा याची गाडी सुसाट, पुढे असे घडले

ind VS ban world cup 2023 : भारताचा वर्ल्ड कपमधील चौथा सामना बांगलादेश संघासोबत गुरुवारी पुणे शहरात होत आहे. या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा याच्या खेळीवर सर्वांच्या नजरा आहेत. त्याचवेळी एका वेगळ्या बातमीमुळे रोहित चर्चेत आला आहे.

Rohit Sharma  | मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर रोहित शर्मा याची गाडी सुसाट, पुढे असे घडले
Rohit SharmaImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 10:25 AM

पुणे | 19 ऑक्टोंबर 2023 : विश्वकरंडक स्पर्धेचा भारताचा चौथा सामना पुणे शहरात गुरुवारी होत आहे. भारत-बांगलादेश यांच्यात हा सामना रंगणार आहे. पुणे शहरातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर कर्णधार रोहित शर्मा याच्या खेळीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण तो गुरुवारी होणाऱ्या सामन्यात इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा वर्ल्ड कपमधील सर्वाधिक धावांचा विक्रम रोहित शर्मा मोडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी गुरुवारी एका बातमीमुळे रोहित शर्मा चर्चेत आला. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर त्याची गाडी सुसाट चालवल्याची ही बातमी आहे.

रोहित शर्माची गाडी सुसाट अन्…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर रोहित शर्मा याने ‘264’ क्रमांक असणारी त्याची लेम्बोर्गिनी ही गाडी चालवली. ही गाडी चालवली म्हणण्यापेक्षा सुसाट पळवली. अगदी 200 किमीच्या वेगाने त्याने ही गाडी पळवली. त्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वेगाने गाडी चालवल्याबद्दल रोहित शर्मा याला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. परंतु या वृत्तीला दुजोरा मिळाला नाही. सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.

पोलिसांनी केली चिंता व्यक्त

रोहित शर्मा याने वेगाने गाडी चालवल्यामुळे पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याने सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या या महामार्गावर पोलीस एस्कॉर्ट असलेल्या बससोबत प्रवास करायला हवा होता, असे म्हटले आहे. रोहित शर्मा याच्या नावावर तीन ऑनलाईन चलन बनवण्यात आल्याचे वृत्त दिले गेले आहे. परंतु पोलिसांकडून या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही.

सोशल मीडियावर रंगील चर्चा

रोहित शर्मा याने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वेगाने गाडी चालवल्याच्या बातमीची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. एका युजरने म्हटले आहे की, रोहित शर्मा याला वेगाची आवड आहे. त्यामुळे त्याने द्रुतगती मार्गावर २०० च्या वेगाने गाडी चालवली. परंतु काहीच हरकत नाही, त्याने सामन्यात २०० धावा काढल्या म्हणजे मजा येईल. सोशल मीडियावर अनेकांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यात काहींनी वेगाने गाडी चालवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Non Stop LIVE Update
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार.
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न.
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?.
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक.
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले...
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले....
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर.
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'.
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.