AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : कॅप्टन रोहित टीमसाठी दुसऱ्या कसोटीत मनाचा मोठेपणा दाखवणार?

Rohit Sharma Australia vs India 2nd test : रोहित शर्मा ऑस्ट्रेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहितच्या त्या एका भूमिकेकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.

AUS vs IND : कॅप्टन रोहित टीमसाठी दुसऱ्या कसोटीत मनाचा मोठेपणा दाखवणार?
Rohit Sharma Test Team IndiaImage Credit source: Stu Forster/Getty Images
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 04, 2024 | 9:27 PM
Share

टीम इंडियाने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली. त्यानंतर रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर इलेव्हनविरुद्ध झालेल्या 50 षटकांच्या सामन्यात शानदार विजय मिळवला. टीम इंडियाचा या विजयामुळे विश्वास दुणावला आहे. दुसरा कसोटी सामना हा डे नाईट असून गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. हा सामना 6 ते 10 डिसेंबर दरम्यान ॲडलेड येथे होणार आहे. दुसऱ्या कसोटीत कर्णधार रोहित शर्मा कोणत्या स्थानी बॅटिंगसाठी येतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

रोहित त्याग करणार का?

रोहितच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटीत केएल राहुल याने यशस्वी जयस्वाल याच्यासह ओपनिंग केली. या जोडीने दुसऱ्या डावात 201 धावांची सलामी आणि विक्रमी भागीदारी केली. भारताच्या विजयात या जोडीने निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर पीएम ईलेव्हन सामन्यातही रोहित टीममध्ये असूनही यशस्वी आणि केएल या दोघांनी ओपनिंग केली. रोहितने तेव्हा मनाचा मोठेपणा दाखवत त्याच्या जागी केएलला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता रोहित दुसर्‍या कसोटीत टीम इंडियाच्या फायद्यासाठी स्वत: न येता यशस्वीच्या जोडीला केएलला ओपनिंग करु देत मनाचा मोठेपणा दाखवणार का? याकडे साऱ्यांच लक्ष असणार आहे.

तसेच रोहितने केएलसाठी मनाचा मोठेपणा दाखवला, तर कॅप्टन कोणत्या स्थानी बॅटिंगसाठी येणार? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. आपण या निमित्ताने रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या स्थानी खेळताना किती धावा केल्या आहेत? हे जाणून घेऊयात.

रोहितची कोणत्या स्थानी सर्वोत्तम कामगिरी

रोहितने आतापर्यंत कसोटीत सर्वाधिक वेळा ओपनिंग केली आहे. रोहितने 66 डावांमध्ये सलामीला येत 44 च्या सरासरीने 9 शतकांसह 2 हजार 685 धावा केल्या आहेत.

रोहितने तिसऱ्या स्थानी 4 सामन्यांमधील 5 डावांमध्ये 21.40 च्या सरासरीने 1 अर्धशतकासह 107 धावा केल्या आहेत. हिटमॅन चौथ्या स्थानी फक्त एकदाच खेळलाय. रोहितने चौथ्या स्थानी खेळताना एकमेव डावात 4 धावा केल्या आहेत.

रोहितने 9 सामन्यांमध्ये 16 डावात पाचव्या स्थानी बॅटिंगला येत 29.13 च्या सरासरीने 3 अर्धशतकांसह 437 धावा केल्या आहेत.

सहाव्या स्थानी उत्तम कामगिरी

रोहितची सहाव्या स्थानी उत्तम कामगिरी राहिली आहे. रोहितने सहाव्या स्थानी 16 सामन्यांमधील 25 डावांमध्ये 54.57 च्या स्ट्राईक रेटने 3 शतकं आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 37 धावा केल्या.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?