RR vs CSK Score And Updates IPL 2025 : राजस्थानची चेन्नईवर 6 धावांनी मात, घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडलं

Rajasthan Royals vs Chennai Super Kings Highlights And Updates In Marathi : राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याचं आयोजन गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. राजस्थानने घरच्या मैदानात चेन्नईवर 6 धावांनी मात करत घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडलं.

RR vs CSK Score And Updates IPL 2025 : राजस्थानची चेन्नईवर 6 धावांनी मात, घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडलं
RR vs CSK Live Updates IPL 2025
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 31, 2025 | 1:06 AM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 11 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आमनेसामने होते. दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना होता. राजस्थानने पहिले दोन्ही सामने गमावले होते. तर चेन्नई विजयी सुरुवातीनंतर दुसरा सामन्यात पराभूत झाली. त्यामुळे चेन्नईचा हा सामना जिंकून विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न होता. तर राजस्थानसमोर विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान होतं. राजस्थानने हे आव्हान यशस्वीरित्या पेललं.  राजस्थानने रियान पराग याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सवर 6 धावांनी मात करत विजयाचं खातं उघडलं. राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र राजस्थानने चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 176 धावांवर रोखलं. राजस्थानने अशाप्रकारे 6 धावांनी विजय मिळवला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Mar 2025 11:30 PM (IST)

    RR vs CSK Live Update : राजस्थानची चेन्नईवर 6 धावांनी मात

    राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर 6 धावांनी मात केली आहे. चेन्नईला 183 धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 176 धावाच करता आल्या. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

  • 30 Mar 2025 11:24 PM (IST)

    RR vs CSK Live Update : महेंद्रसिंह धोनी आऊट, चेन्नईला सहावा झटका

    महेंद्रसिंह धोनी 16 रन्स करुन आऊट झाला आहे.  चेन्नईने सहावी विकेट गमावली आहे.

  • 30 Mar 2025 11:08 PM (IST)

    RR vs CSK Live Update : ऋतुराज गायकवाड आऊट, चेन्नईला पाचवा झटका

    चेन्नईला पाचवा झटका लागला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड 63 रन्स करुन आऊट झाला आहे.

  • 30 Mar 2025 10:41 PM (IST)

    RR vs CSK Live Update : विजय शंकर आऊट, चेन्नईला चौथा झटका

    चेन्नईने चौथी विकेट गमावली आहे. विजय शंकर 9 रन्स करुन आऊट झाला आहे.

  • 30 Mar 2025 10:29 PM (IST)

    RR vs CSK Live Update : शिवम दुबे आऊट, रियान परागचा कडक कॅच

    रियान पराग याने अफलातून कॅच घेत स्फोटक फलंदाज शिवम दुबे याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. चेन्नईने यासह तिसरी विकेट गमावली. शिवम 18 रन्स करुन आऊट झाला.

  • 30 Mar 2025 10:15 PM (IST)

    RR vs CSK Live Update : राहुल त्रिपाठी आऊट, चेन्नईला दुसरा झटका

    चेन्नईने दुसरी विकेट गमावली आहे. राहुल त्रिपाठी 23 धावा करुन आऊट झाला.

  • 30 Mar 2025 09:39 PM (IST)

    RR vs CSK Live Update : रचीन रवींद्र झिरोवर आऊट, चेन्नईला मोठा झटका

    राजस्थानने कडक सुरुवात केली आहे. राजस्थानच्या जोफ्रा आर्चरने रचीन रवींद्र याला ध्रुव जुरेल याच्या हाती झिरोवर कॅच आऊट केलं आहे.

  • 30 Mar 2025 09:36 PM (IST)

    RR vs CSK Live Update : चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात, रचीन-राहुल सलामी जोडी मैदानात

    चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. रचीन रवींद्र आणि राहुल त्रिपाठी सलामी जोडी मैदानात आली आहे.चेन्नईसमोर विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आहे.

  • 30 Mar 2025 09:21 PM (IST)

    RR vs CSK Live Update : चेन्नईसमोर 183 धावांचं आव्हान

    राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 182 धावा केल्या.

  • 30 Mar 2025 09:08 PM (IST)

    RR vs CSK Live Update : जोफ्रा आर्चर आऊट, राजस्थानला सातवा झटका

    जोफ्रा आर्चर आऊट झाला आहे. राजस्थानने यासह सातवी विकेट गमावली आहे.

  • 30 Mar 2025 09:03 PM (IST)

    RR vs CSK Live Update : रियान पराग बोल्ड, राजस्थानला सहावा झटका

    चेन्नईे राजस्थानला सहावा झटका दिला आहे. मथीशा पथीराणा याने राजस्थानचा कर्णधार रियान पराग याला क्लिन बोल्ड केलं आहे. रियानने 28 बॉलमध्ये 37 रन्स केल्या.

  • 30 Mar 2025 08:44 PM (IST)

    RR vs CSK Live Update : वानिंदू हसरंगा आऊट, राजस्थानला पाचवा झटका

    राजस्थानने पाचवी विकेट गमावली आहे.  वानिंदू हसरंगा 4 रन्स करुन आऊट झाला आहे.

  • 30 Mar 2025 08:36 PM (IST)

    RR vs CSK Live Update : ध्रुव जुरेल आऊट, राजस्थानला चौथा धक्का

    चेन्नईने राजस्थानला चौथा धक्का दिला आहे.  नूर अहमद याने मथीशा पथीराणा याच्या हाती ध्रुवला 3 धावांवर कॅच आऊट केलं.

  • 30 Mar 2025 08:28 PM (IST)

    RR vs CSK Live Update : नितीश राणा आऊट, राजस्थानला तिसरा धक्का

    चेन्नईने राजस्थानला तिसरा झटका दिला आहे. नितीश राणा 81 धावा करुन आऊट झाला.  धोनीने अश्विनच्या बॉलिंगवर नितीशला स्टंपिंग केलं.

  • 30 Mar 2025 08:10 PM (IST)

    RR vs CSK Live Update : संजू सॅमसन आऊट, राजस्थानला दुसरा धक्का

    चेन्नईने राजस्थानला दुसरा धक्का दिला आहे.  नूर अहमद याने संजू सॅमसन याला रचीन रवींद्र याच्या हाती  20 रन्सवर आऊट केलं आहे.

  • 30 Mar 2025 07:33 PM (IST)

    RR vs CSK Live Update : यशस्वी जयस्वाल आऊट, राजस्थानला पहिला धक्का

    चेन्नईने पहिल्याच ओव्हरमध्ये राजस्थानला पहिला झटका दिला आहे.  यशस्वी जयस्वाल 4 रन्स करुन आऊट झाला आहे. खलील अहमद याने यशस्वीला आर अश्विन याच्या हाती कॅच आऊट केलं आहे.

  • 30 Mar 2025 07:32 PM (IST)

    RR vs CSK Live Update : सामन्याला सुरुवात, राजस्थानची बॅटिंग, यशस्वी-संजू मैदानात

    राजस्थान-चेन्नई सामन्याला सुरुवात झाली आहे. चेन्नईने टॉस जिंकून राजस्थान बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. राजस्थानकडून संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 30 Mar 2025 07:12 PM (IST)

    RR vs CSK Live Update : राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन

    राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.

  • 30 Mar 2025 07:12 PM (IST)

    RR vs CSK Live Update : चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन

    चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रुतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), जेमी ओव्हरटन, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पाथिराना आणि खलील अहमद.

     

  • 30 Mar 2025 07:01 PM (IST)

    RR vs CSK Live Update : चेन्नईने टॉस जिंकला, राजस्थानविरुद्ध निर्णय काय?

    चेन्नईने टॉस जिंकला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने राजस्थानविरुद्ध बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 30 Mar 2025 06:50 PM (IST)

    RR vs CSK Live Updates : राजस्थान-चेन्नई आमनेसामने, थोड्याच वेळात टॉस

    राजस्थान-चेन्नई सामन्याआधी क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे टॉसकडे लागून आहे. राजस्थानच्या घरच्या मैदानात हा सामना होत आहे. त्यामुळे या टॉसकडे राजस्थानच्या चाहत्यांचं अधिक लक्ष आहे.

  • 30 Mar 2025 06:10 PM (IST)

    RR vs CSK Live Updates : राजस्थान रॉयल्स टीम

    राजस्थान रॉयल्स टीम : रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शुभम दुबे, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, युद्धवीर सिंह चरक, महीश तीक्षाना, क्वेना मफाका, अशोक शर्मा, वैभव सूर्यवंशी आणि कुणाल सिंग राठौर.

  • 30 Mar 2025 05:56 PM (IST)

    RR vs CSK Live Updates : चेन्नई सुपर किंग्ज टीम

    चेन्नई सुपर किंग्ज टीम: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकीपर), सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.

  • 30 Mar 2025 05:45 PM (IST)

    RR vs CSK Live Updates : राजस्थान विरुद्ध चेन्नई आमनेसामने

    आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 11 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे.