
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने आयपीएल 2025 मधील तडाखा कायम ठेवत राजस्थान रॉयल्स विरुद्ध झंझावाती खेळी केली आहे. रोहितने जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळवण्यात येत असलेल्या आयपीएलच्या 50 व्या सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. रोहितने यासह मुंबईला त्याच्या बर्थडेचं गिफ्ट दिलंय.रोहितचा 30 एप्रिलला वाढदिवस होता. रोहितने आपल्या बॅटने मुंबईला हे अप्रतिम गिफ्ट दिलं आहे. रोहितच्या या अर्धशतकी खेळीमुळे मुंबई मजबूत स्थितीत पोहचली आहे. रोहितच्या आयपीएल कारकीर्दीतील हे 46 वं अर्धशतक ठरलं. रोहितला या मोसमातील सुरुवातीच्या सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र रोहितने त्यानंतर जोरदार कमबॅक केलं. त्यानंतर रोहितने हे सातत्य कायम ठेवलंय.
राजस्थानकडून महीश तीक्षणा मुंबईच्या डावातील 12 वी ओव्हर टाकायला आला. रोहितने महीशच्या या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर फोर लगावला. रोहितने यासह अर्धशतक पूर्ण केलं. रोहितने 31 चेंडूत 161.29 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. रोहितने या खेळीत 36 रन्स या फक्त चौकारांच्या मदतीने केल्या. रोहितने अर्धशतकी खेळीत 9 चौकार लगावले.
रोहितचं हे या 18 व्या मोसमातील तिसरं अर्धशतक ठरलं. विशेष म्हणजे रोहितचं हे 5 डावातील तिसरं अर्धशतक ठरलं. रोहितने या मोसमात याआधी चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांविरुद्ध सलग अर्धशतक झळकावलं होतं. रोहितने गेल्या 4 डावात अनुक्रमे 26, 76, 70 आणि 12 अशा एकूण 184 धावा केल्या आहेत.
रोहितला या सामन्यात आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र रोहित या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. रोहित अर्धशतकानंतर अवघ्या 3 धावा केल्यानंतर आऊट झाला. रोहितला राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने आऊट केला. रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल याच्या हाती कॅच आऊट झाला. रोहितने 36 बॉलमध्ये 53 रन्स केल्या.
दरम्यान रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने मुंबईला अप्रतिम सुरुवात करुन दिली. रोहित आणि रायन या जोडीने 11.5 ओव्हरमध्ये 116 धावांची शतकी भागीदारी केली. रोहित आणि रायन यासह मुंबईसाठी आयपीएलमध्ये शतकी सलामी भागीदारी करणारी तिसरी जोडी ठरली. मुंबईसाठी याआधी 2014 साली लेंडी सिमन्स आणि मायकल हसी या दोघांनी 120 धावांची सलामी भागीदारी केली होती. तर सर्वात आधी 2012 साली सचिन तेंडुलकर आणि ड्वेन स्मिथ या जोडीने 163 धावांची सलामी आणि विक्रमी भागीदारी करत इतिहास घडवला होता.
सहा हजारी रोहित, पलटणची शान
Mumbai cha Raja, Mumbai cha history-maker 🫡
Rohit Sharma completes 6️⃣0️⃣0️⃣0️⃣* runs for MI 💙#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #RRvMI
— Mumbai Indians (@mipaltan) May 1, 2025
रोहितने यासह आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. रोहित टी 20 क्रिकेटमध्ये एका टीमकडून 6 हजार धावा करणारा विराट कोहली याच्यानंतर दुसरा फलंदाज ठरला आहे. तसेच रोहितने यासह रेकॉर्ड ब्रेकही केला आहे. रोहितने इंग्लंडच्या जेम्स विंग याचा विक्रम मोडीत काढला आहे. जेम्सने हँपशायरसाठी 5 बजार 934 धावा केल्यात. तर विराटने आरसीबीसाठी 8 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.