Rudi Koertzen Death : फलंदाजी करताना माझ्यावर रागवायचे, रुडी कोएर्टझेन यांच्या निधनानं सेहवाग भावूक

| Updated on: Aug 10, 2022 | 9:55 AM

Rudi Koertzen Death : मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोर्टझेन नेल्सन मँडल बे येथे असलेल्या केपटाऊनमधून घरी परतत होते. यादरम्यान रिव्हर्सडेलजवळ त्यांची कार दुसऱ्या वाहनाला धडकली आणि अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

Rudi Koertzen Death : फलंदाजी करताना माझ्यावर रागवायचे, रुडी कोएर्टझेन यांच्या निधनानं सेहवाग भावूक
दक्षिण आफ्रिकेचे माजी पंच रुडी कोर्टझेन
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचे माजी पंच रुडी कोर्टझेन (Rudi Koertzen) यांचा कार अपघातात मृत्यू  (Death) झाला आहे. गोल्फमधून परतत असताना कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. त्यांचे नाव क्रिकेटमधील (Cricket) महान पंचांपैकी एंक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोर्टझेन नेल्सन मँडल बे येथे असलेल्या केपटाऊनमधून घरी परतत होते. यादरम्यान रिव्हर्सडेलजवळ त्यांची कार दुसऱ्या वाहनाला धडकली आणि अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात कोर्टझेन व्यतिरिक्त आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील महान क्रिकेट पंचांपैकी एक असलेल्या कोर्टझेन यांच्या सन्मानार्थ, दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांच्या पुढच्या सामन्यात हातात काळी पट्टी बांधून मैदानात उतरेल. रुडी कोर्टझेन यांच्या मुलाने वडिलांच्या मृत्यूची बातमी देताना सांगितले की, कोर्टझेन त्याच्या काही मित्रांसह गोल्फ खेळण्यासाठी गेले होते आणि सोमवारी परतणार होता. परंतु त्यांनी कदाचित दुसरी फेरी खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते उशिरा परत येत असल्याने त्यांच्या कारला अपघात झाला.

सेहवागचं ट्विट

सेहवागचे भावनिक ट्विट

“रुडी कॉर्टझेनच्या कुटुंबाबद्दल शोक व्यक्त करतो. त्यांच्याशी त्याचे चांगले संबध होते. जेव्हा मी जोरदार बॅटींग करायचो तेव्हा ते मला सांगायचे की व्यवस्थित आणि टिकून खेळ कारण त्यांना माझी बॅटींग अधिक काळ बघायची असत. “एकदा त्यांना आपल्या मुलासाठी क्रिकेट पॅडचा एक खास ब्रँड विकत घ्यायचा होता. त्यांनी मला त्याबद्दल विचारले. त्यामुळे मी त्यांना एक पॅड भेट म्हणून दिले ज्याबद्दल ते खूप आनंदी होते. एक सज्जन आणि एक अतिशय अद्भुत माणूस होते. रुडीला तुझी आठवण येईल.” अशा भावना सेहवाग याने व्यक्त केल्या आहेत. युवराज सिंह यानेही आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.