Ruturaj Gaikwad ने रचला नवीन इतिहास, सेमीफायनलमध्ये जबरदस्त प्रदर्शन, वर्ल्ड रेकॉर्ड तोडला

रोक सको तो रोक लो, ऋतुराजच्या बॅटिंगचे आकडे पाहूनच डोळे विस्फारतील....

Ruturaj Gaikwad ने रचला नवीन इतिहास, सेमीफायनलमध्ये जबरदस्त प्रदर्शन, वर्ल्ड रेकॉर्ड तोडला
Ruturaj-GaikwadImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 1:03 PM

मुंबई: महाराष्ट्राचा कॅप्टन ऋतुजराज गायकवाड सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियातील स्थान गमावल्यापासून तो सातत्याने धावांचा पाऊस पाडतोय. ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये शतक झळकावलं. त्यानंतर त्याने आता सेमीफायनल मॅचमध्येही शतकी कामगिरी केली आहे.

सेमीफायनलमध्ये शतक

महाराष्ट्राचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडने आता आसाम विरुद्ध 88 चेंडूत शतक झळकावलं. गायकवाड या मॅचमध्ये 168 धावांची जबरदस्त इनिंग खेळला. त्याने 6 षटकार आणि 18 चौकार लगावले. ऋतुराज गायकवाडने लिस्ट ए क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. या फॉर्मेटमध्ये 60 पेक्षा जास्त सरासरी असलेला क्रिकेट विश्वातील एकमेव फलंदाज आहे.

मागच्या सामन्यात अनेक विक्रम

ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मागच्या 9 डावात 7 शतकं झळकावली आहेत. यात एक डबल सेंच्युरी आहे. गायकवाडने मागच्या उत्तर प्रदेश विरुद्धच्या सामन्यात नाबाद 220 धावा फटकावल्या. त्याने या सामन्यात अनेक विक्रम केले. 49 व्या ओव्हरमध्ये शिवा सिंहच्या गोलंदाजीवर त्याने 7 सिक्स मारले. यूपी विरोधातील या मॅचमध्ये त्याने 16 सिक्स आणि 10 चौकार मारले.

ते ओळखण्याची जबाबदारी त्या पालकांची

“प्रत्येक बाळ जन्माला आल्यानंतर त्यात एक विशेष गुण असतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, अशी म्हणं आहे. फक्त आपलं बाळ कशात पारंगत होऊ शकतं, ती ओळखण्याची जबाबदारी त्या पालकांची असते” असं ऋतुराज गायकवाडचे वडिल म्हणाले. “लहान असतानाच, ऋतुराज चांगलं क्रिकेट खेळतोय, हे लक्षात आलं. त्यामुळे क्रिकेट क्षेत्र निवडल्यानंतर त्यात त्याला सपोर्ट केला” असं वडिल म्हणाले.

वाढदिवसाचा काय किस्सा आहे?

“ऋतुराजचा कालचा खेळ सर्वोच्च होता. त्याच्या रेकॉर्डवर आनंद आहे. भविष्यातही त्याने असाच खेळ खेळावा” अशी अपेक्षा वडिलांनी व्यक्त केली. वाढदिवसाला दिलेल्या गिफ्टचा किस्सा सांगताना वडिल म्हणाले की, “प्रत्येक आई-वडिल आपल्या मुलाला वाढदिवसाला गिफ्ट देत असतात. आम्ही त्याला क्रिकेटशी संबंधित गिफ्ट दिलं. आम्ही त्याच्यासोबत घरगुती वातावरणात खेळायचो. बहिण, आई, आम्ही चार-पाच वर्ष त्याच्यासोबत क्रिकेट खेळलो. त्याची प्रगती दिसत होती. त्यानंतर आम्ही त्याला वेंगसरकर क्रिकेट अकादमीत दाखल केलं”

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.